शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांच्या समक्ष आत्महत्येच्या चर्चेचे वादंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 02:01 IST

एकमेकांवर असलेल्या कर्जाची विचारणा करून ऊस उत्पादक शेतकरी व चांदवडचे आमदार डॉ. राहुल अहेर या दोघांमध्ये जिल्हाधिकाºयांसमक्ष आत्महत्या करण्यावरून चांगलेच वादंग झाले. शेतकºयाने यापूर्वी आत्महत्येचा केलेल्या प्रयत्नाचा धागा पकडून अहेर यांनी ‘तुम्ही अर्धी बाटली प्या, मी पण अर्धी पितो’, असा सल्ला शेतकºयाला दिल्यामुळे काही वेळ वातावरणात तणाव निर्माण झाला; परंतु उपस्थित अधिकारी व अन्य शेतकºयांनी मध्यस्थी करून वादावर पडदा टाकण्यात आला.

ठळक मुद्देवसाका उसाचे पेमेंट : शेतकरी-आमदारामध्ये जुंपली

नाशिक : एकमेकांवर असलेल्या कर्जाची विचारणा करून ऊस उत्पादक शेतकरी व चांदवडचे आमदार डॉ. राहुल अहेर या दोघांमध्ये जिल्हाधिकाºयांसमक्ष आत्महत्या करण्यावरून चांगलेच वादंग झाले. शेतकºयाने यापूर्वी आत्महत्येचा केलेल्या प्रयत्नाचा धागा पकडून अहेर यांनी ‘तुम्ही अर्धी बाटली प्या, मी पण अर्धी पितो’, असा सल्ला शेतकºयाला दिल्यामुळे काही वेळ वातावरणात तणाव निर्माण झाला; परंतु उपस्थित अधिकारी व अन्य शेतकºयांनी मध्यस्थी करून वादावर पडदा टाकण्यात आला.विठेवाडी येथील वसंतदादा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामासाठी शेतकºयांना २३०० रुपये भाव देण्याचे कारखान्याने जाहीर केले होते. त्यानुसार ऊस उत्पादकांना प्रारंभी पाचशे रुपयांचा हप्ता दिला व शेतकºयांनी ऊस तोडून नेला. शेतकºयांना उसाचे पैसे देण्यासाठी ठरवून दिलेला कालावधी उलटून गेल्यानंतरही पैसे मिळत नसल्याचे पाहून शेतकºयांनी तगादा लावताच, काही शेतकºयांना नऊशे रुपये अदा करण्यात आले. त्यानंतर मात्र शेतकºयांना उर्वरित पैशांसाठी तारीख पे तारीख देण्यात आली. शेकडो ऊस उत्पादकांचे कोट्यवधी रुपये कारखान्याकडे घेणे असताना सदरचा कारखाना प्रशासकीय मंडळाने खासगी व्यक्तीला चालविण्यासाठी दिला. (पान ५ वर)असे करताना ऊस उत्पादक शेतकºयांचे चुकारे पूर्ण करण्यात आल्याचे खोटे दाखवून सहकार आयुक्तांकडून ना हरकत प्रमाणपत्रही मिळविण्यात आले. आता कारखाना खासगी व्यक्तीच्या ताब्यात असून, ऊस उत्पादक शेतकºयांची थकीत रक्कम देण्यास तत्कालीन संचालक मंडळ तसेच सध्याच्या ठेकेदारानेदेखील हात वर केले आहेत. अशा परिस्थितीत थकीत पैसे मिळावे यासाठी शेतकरी आंदोलन करीत असताना बाळासाहेब डेर्ले या शेतकºयाने काही दिवसांपूर्वी कारखान्याच्या बॉयलरवर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्याला पैसे देण्याचे आश्वासन देऊन समजाविण्यात आल्यावर या संदर्भात गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन यांच्याकडे ऊस उत्पादक शेतकरी, आमदार राहुल आहेर व वसाका कारखान्याच्या ठेकेदार यांची संयुक्त बैठक झाली. यावेळी झालेल्या चर्चेत बाळासाहेब डेर्ले यांनी पैसे मिळत नसतील तर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसल्याचा उल्लेख करताच, आमदार आहेर यांनी त्यांना किती कर्ज आहे, अशी विचारणा केली त्यावर डेर्ले यांनी तीन लाख रुपये असे सांगितले. त्यावर आहेर यांनी माझ्यावर सात कोटी रुपयांचे कर्ज असून, ‘तुम्ही पण अर्धी बाटली प्या व मी पण अर्धी पितो’ असा सल्ला दिला.दोघांमध्ये सुरू असलेल्या संभाषणामुळे वातावरण गंभीर वळणावर येऊन पोहोचताच, उपस्थित शेतकºयांनी तसेच अधिकाºयांनी मध्यस्थी करून दोघांनाही शांत केले. यावेळी शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांकडे आपली बाजू मांडली. तर आमदार आहेर यांनी यासंदर्भात लवकरच शेतकरी व कारखाना चालविणाºया ठेकेदाराची संयुक्त बैठक घेण्याचे मान्य केले.चौकट=====

टॅग्स :Nashikनाशिकcollectorजिल्हाधिकारी