शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

लष्करी अळी नियंत्रणासाठी कृषी विभाग सरसावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 16:18 IST

सातारे येथे चर्चासत्र : शेतात जाऊन मका पिकांचे निरीक्षण

ठळक मुद्देनिरीक्षणात पानावर पांढ-या खिडकीच्या आकाराचे पट्टे दिसल्यास किंवा आळीचा प्रादुर्भाव दिसल्यास उपाययोजना कराव्यात.

जळगाव नेऊर : .येवला तालुक्यातील सातारे येथील शेतकरी अशोक रंगनाथ दखणे यांच्या शेतात मका पिकावरील ‘अमेरिकन लष्करी आळी’ या विषयावर तालुका कृषी अधिकारी येवला यांच्यामार्फत चर्चासत्र व प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेतकरी बांधवांना प्रत्यक्ष मका पिकाच्या प्लॉटवर घेऊन जात पिकाचे निरीक्षण करण्यात आले. याशिवाय, कृषी अधिकारी कारभारी नवले यांनी कृषी विभागाच्या विविध योजना व पिक विमा या विषयावरही सविस्तर मार्गदर्शन केले.मंडळ कृषी अधिकारी ज्ञानेश्वर गायके यांनी मका पिकावर येणाऱ्या लष्करी अळीचा जीवनक्र म सांगत नुकसानीबरोबर या किडीची माहिती दिली. तसेच अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रण , बियाणे पेरणीपूर्वी देण्याची औषधे, करावयाची उपायोजना यासंदर्भातही सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच मका उगवणीनंतर निंबोळी अर्कची फवारणी, मका पिकात पक्षी थांबे ,लाईट ट्रॅप ,व कामगंध सापळी लावण्यात यावी याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. चर्चासत्रात पाटोदा येथील मंडल कृषी अधिकारी जनार्दन क्षिरसागर यांनी हुमणी किड नियंत्रण याविषयी माहिती दिली. प्रकाश जवणे यांनी प्रास्ताविक केले. भास्कर नाईकवाडे यांनी आभार मानले. या कार्यक्र मासाठी शेतकरी संघटनेचे संतु पाटील पाटील झांबरे, नामदेव गवारे, भाऊसाहेब पठारे ,आप्पासाहेब पठारे, शांताराम पाटील, साईनाथ गचाले, ज्ञानेश्वर गचाले, ज्ञानेश्वर पठारे, दत्तू दखणे, गणपत काळे आदी उपस्थित होते.असे करा व्यवस्थापन?१) मका पेरणी करतांना प्रत्येक गावाने सलग एक दोन दिवसातच पेरणी करावी.२)बिज प्रक्रि या करूनच मका बियाणे पेरणी करावी.३) ज्या शेतकऱ्यांची पेरणी बाकी आहे किंवा ज्यांनी नुकतीच पेरणी केलेली आहे अशा शेतक-यांनी मका पिकात १० ते १५ओळीनंतर तुर/मुग/उडीद या सापळा पिकाची लागवड करावी.४) पेरणी झाल्यानंतर ७ ते ८ दिवसांनंतर शेतामध्ये रोज नागमोडी पद्धतीने निरीक्षण करावे, निरीक्षणात पानावर पांढ-या खिडकीच्या आकाराचे पट्टे दिसल्यास किंवा आळीचा प्रादुर्भाव दिसल्यास उपाययोजना कराव्यात.५) एकरी ४ ते ५ किंवा त्यापेक्षा अधिक पक्षी थांबे उभारावेत किंवा कामगंध सापळे एकरी २ ते ४ याचा वापर करावा.६) मका पिकावर गुळाची फवारणी करावी ,त्यामुळे मुंगळे हे अंडी व अळ्या नष्ट करतील.७) आळीचा प्रादुर्भाव जास्त दिसल्यास आळीच्या अवस्थेनुसार रासायनिक औषधांची फवारणी करावी.

 

टॅग्स :Nashikनाशिक