मालेगाव : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बकरी ईद सणाच्या वेळी मालेगाव शहरात तात्पुरते कत्तलखाने उघडण्यात येऊ नयेत व शहरातील बेकायदेशीर कत्तलींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी गोवंश विकास प्रकोष्ठतर्फे अनुक्रमे येथील मनपा आयुक्त व नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली असल्याची माहिती येथे पत्रकार परिषदेत देण्यात आली. बकरी ईद सणानिमित्त कोणत्याही प्रकारे तात्पुरते कत्तलखाने घडण्यात येऊ नयेत, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या अनुपम मेहता व ए. ए. सय्यद या पीठाने दिला आहे. तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश खानविलकर यांनी सार्वजनिक ठिकाणी कुठेही जनावरांची कत्तल केल्यास आणि पोलिसांनी त्याची दखल न घेतल्यास तो न्यायालयाचा अवमान होईल, असा निकाल दिला होता.
बेकायदेशीर कत्तलींवर नियंत्रण
By admin | Updated: October 6, 2014 00:39 IST