शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कर्मवीर दादासाहेब स्वाभीमान योजनेतील जमिनीचा मोबदला वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 14:25 IST

शासकीय विश्रामगृहावर सामाजिक न्यायराज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्याच्या सामाजिक व न्याय विभागाच्या नाशिाक विभागातील विविध योजनांचा व्यापक आढावा घेतला. त्यावेळी नाशिक विभागात अनुसूचित जातीची लोकसंख्या किती ? त्यात दारिद्रए रेषेखालील लोकसंख्या किती? अनुसुचित जातीच्या साक्षरतेचे प्रमाण

ठळक मुद्देरामदास आठवले यांचे संकेत : समाजकल्याण योजनांचा आढावा एकरी तीन लाख रूपयात कोणी जमीन देण्यास तयार नाही

नाशिक : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभीमान योजनेतंर्गंत जिरायती व बागायती जमीनीच्या खरेदीसाठी ठरविण्यात आलेले दर अल्प असल्यामुळे कोणीही जमीन देण्यास पुढे येत नसल्याने हा मोबदला वाढवून देण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना देण्यात येतील असे संकेत केंद्रीय सामाजिक न्यायराज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले आहेत.शासकीय विश्रामगृहावर सामाजिक न्यायराज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्याच्या सामाजिक व न्याय विभागाच्या नाशिाक विभागातील विविध योजनांचा व्यापक आढावा घेतला. त्यावेळी नाशिक विभागात अनुसूचित जातीची लोकसंख्या किती ? त्यात दारिद्रए रेषेखालील लोकसंख्या किती? अनुसुचित जातीच्या साक्षरतेचे प्रमाण? या प्रश्नांची उपस्थित अधिका-यांकडून उत्तरे जाणून घेतली तसेच भारत सरकार शिष्यवृत्ती नाशिक विभागात आत्तपार्यंत किती मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात आला. नाशिक विभागातील ५३ शासकीय वसतिगृहांमध्ये किती विद्यार्थ्यांना मोफत निवास व शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. विभागातील ५०२ अनुदानित वसतिगृहामध्ये किती विद्यार्थी शिक्षण घेतात? वसतिगृहांचा दर्जा कसा आहे? अशा प्रश्नांच्या माध्यमातून योजनांचा त्यांनी आढावा घेतला.कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभीमान योजनेत अनुसूचित जातीच्या भूमिहीन लाभार्थ्यांना चार एकर जिरायती किंवा दोन एक बागायती जमीन देण्याची तरतूद आहे. मात्र सदर योजनेत एकरी तीन लाख रूपयात कोणी जमीन देण्यास तयार नसल्यामुळे या योजनेला राज्यात अल्प प्रतिसाद लाभत आहे. त्यावर आठवले यांनी याबाबत एकरी सहा लाख रूपये मोबदला वाढवून देण्यासाठी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी तसा प्रस्ताव तयार करण्यास सांगतो असे आश्वासन दिले. यावेळी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, अनुसूचित जाती उपयोजना, रमाई आवास योजना, दलीत वस्ती सुधार योजनेचा आढावाही रामदास आठवले यांनी घेतला. या बैठकीस जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष पी. व्ही. पाटोळे, प्रादेशिक उपायुक्त राजेंद्र कलाल, सहाय्यक आयुक्त श्रीमती प्राची वाजे आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक