शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल भारत घडविण्यासाठी योगदान द्या : सुभाष भामरे

By admin | Updated: July 12, 2017 15:49 IST

डिजिटल भारत घडविण्यासाठी सर्व देशप्रेमी व्यावसायिकांनी प्रामाणिकपणे योगदान देऊन ‘जीएसटी’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रयत्नशील रहावे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : डिजिटल भारत घडविण्यासाठी सर्व देशप्रेमी व्यावसायिकांनी प्रामाणिकपणे योगदान देऊन ‘जीएसटी’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रयत्नशील रहावे. ग्राहकांनीदेखील ‘जीएसटी’ करप्रणाली व त्यामुळे होणारे राष्ट्र उभारणीचे कार्य लक्षात घेऊ मोलाची साथ द्यावी, असे आवाहन कें द्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केले.मंगळवारी डॉ. भामरे जिल्हा दौऱ्यावर आले होते. सकाळी सिडको येथील ‘जीएसटी’ कार्यालयात त्यांनी शहरातील औद्योगिक संघटनांसह विविध व्यावसायिक, ट्रेडर्स संघटनांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करताना डॉ. भामरे बोलत होते. व्यासपीठावर वस्तू व सेवा कर विभागाचे आयुक्त आर. पी. शर्मा, अपिलीय आयुक्त मनोज शर्मा उपस्थित होते. डॉ. भामरे म्हणाले, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडून केंद्राचा प्रतिनिधी म्हणून उपस्थित झालो आहे. जीएसटीबाबत जनजागृती तसेच प्रशासकीय अडचणींवर मात करून कार्यप्रणालीत सुलभता आणण्याची उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी माझ्यावर सरकारने सोपविली आहे. करप्रणालीमध्ये पारदर्शकता, सुसूत्रता आणण्यासाठी व भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी जीएसटीची मोठी गरज होती. राष्ट्राला प्रगतीच्या वाटेवर गतिमान करून डिजिटल भारताच्या निर्मितीकरिता जीएसटी करप्रणाली काळाची गरज होती ती मोदी सरकारने पूर्ण केली. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी व्यावसायिक वर्गाने सकारात्मक दृष्टिकोनातून जीएसटीचा स्वीकार करावा, असे भामरे यावेळी म्हणाले.