शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी वाहनचालकांचे वेतन थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 01:00 IST

जिल्हा परिषदेतील जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम अभियाना अंतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी वाहनचालकांचे तीन महिन्यांपासून प्रलंबित असलेले वेतन त्वरित देण्यात यावे तसेच कनिष्ठ सहायक लिपिकावर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी माथाडी व जनरल कामगार युनियचे जिल्हाध्यक्ष शिवराज ओबेरॉय यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांना दिले.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : कामगार संघटनांकडून आंदोलनाचा इशारा

नाशिक : जिल्हा परिषदेतील जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम अभियाना अंतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी वाहनचालकांचे तीन महिन्यांपासून प्रलंबित असलेले वेतन त्वरित देण्यात यावे तसेच कनिष्ठ सहायक लिपिकावर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी माथाडी व जनरल कामगार युनियचे जिल्हाध्यक्ष शिवराज ओबेरॉय यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांना दिले.मातामृत्यू व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाकडून जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. गरोदर मातेस व एक वर्षाखालील आजारी बालकास घरापासून रुग्णालयापर्यंत तसेच रुग्णालयापासून घरापर्यंत मोफत वाहतूक सेवा या जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम अंतर्गत राबविली जाते. नाशिक जिल्ह्यातील जवळपास ६४ वाहनचालक हे जननी शिशु सुरक्षा कार्यक्र माअंतर्गत कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत. परंतु त्यांना गेल्या तीन महिन्यांपासून मोबदला मिळालेला नाही. भोपाळच्या मे. अशकोम मेडिया इंडिया प्रा.लि., या कंपनीकडे वाहनचालक पुरविण्याचे कंत्राट असून, आॅगस्ट महिन्यापासून वाहनचालकांना त्यांचे वेतन मिळालेले नाही. कामगारांच्या पगाराची तजवीज करण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांनी पार न पाडल्याने वाहनचालकांची दिवाळीही अंधारातच गेली. याची दखल घेत शिवराज ओबेरॉय यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांना निवेदन दिले.मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.यावेळी मुकेश शेवाळे, गणेश पवार, अनिकेत कपोते, अनिल ठाकरे, प्रशांत पाटील, अक्षय खंदारे, रवि बोरसे आदी पदाधिकाºयांसह ठगाराम गायकवाड, महेश बेंडकुळे, चेतन जाधव, भाऊसाहेब गुळवे, भास्कर गायकवाड, रामलाल जाधव, उत्तम पवार, सिद्धार्थ सुपारे, मोठाभाऊ पवार, समाधान शेवाळे आदी वाहनचालक उपस्थित होते.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदMONEYपैसा