शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

ठेकेदार काळ्या यादीत; शाखा अभियंता निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 19:39 IST

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वरसविहीर ते बोरपाडा असे या रस्त्याचे काम असून, सदरच्या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने केले गेलेले असताना जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने त्याचे देयक अदा केल्याची तक्रार

ठळक मुद्देएकाच कामाचे दोन देयके : जिल्हा परिषदेची कारवाईगेल्या दोन वर्षांपासून सदर कामाची चौकशी रखडली

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित असलेले काम जिल्हा परिषदेने आपल्याकडे दाखवून परस्पर ठेकेदाराला देयक अदा करणारे जिल्हा परिषदेच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शाखा अभियंत्याला सेवेतून निलंबित तर बनवाबनवी करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले असून, या कामावर झालेल्या खर्चाची वसुलीही दोघांकडून करण्यात येणार आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वरसविहीर ते बोरपाडा असे या रस्त्याचे काम असून, सदरच्या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने केले गेलेले असताना जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने त्याचे देयक अदा केल्याची तक्रार जिल्हा परिषदेच्या सदस्य रूपांजली माळेकर यांनी जिल्हा परिषदेच्या आजवरच्या अनेक सभांमध्ये केली होती. या तक्रारीच्या पृष्ठर्थ माळेकर यांनी स्वत:च माहिती अधिकारात गोळा केलेले कागदपत्रे व या रस्त्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या कामाचे पुरावेदेखील सर्वसाधारण सभेत तत्कालीन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांच्याकडे सोपविली होती. या तक्रारीची दखल घेत जिल्हा परिषद प्रशासनाने सदरची चौकशी सुरू केली, परंतु चौकशीचा गाडा पुढे न सरकल्याने त्याबाबत पुन्हा तक्रार झाल्यावर सार्वजनिक बांधकाम खात्याकडे या रस्त्याच्या कामाची चौकशी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात पुन्हा कालापव्यय होऊन जिल्हा परिषदेने पुन्हा ही चौकशी आपल्याकडे घेतली. गेल्या दोन वर्षांपासून सदर कामाची चौकशी रखडली असताना अखेर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, वित्त व लेखा अधिकारी, कार्यकारी अभियंता व सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशा चौघा अधिकाºयांची समिती नेमण्यात आली. या समितीने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरा ते स्मशानभूमीपर्यंतच्या रस्त्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. या कामात दोन कोटी ८८ लाख रुपये खर्च करून ९७ मीटरचा रस्ता प्रत्यक्षात तयारच झालेला नसल्याचे आढळून आल्याचा अहवाल समितीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी यांना सादर केला.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद