शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनचं 'ऑपरेशन स्पायडरवेब'! ४ एअरबेस, ४० एअरक्राफ्ट उद्ध्वस्त; रशियाला २०० कोटी डॉलरचा फटका
2
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
3
MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल
4
हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
5
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
6
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
7
Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!
8
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
9
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
10
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
11
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
12
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
13
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
14
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
15
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
16
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
17
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
18
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
19
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
20
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या

ठेकेदार न मिळण्याची हॅट्ट्रिक

By admin | Updated: May 3, 2016 00:06 IST

आयटी पार्कला प्रतिसाद नाही : पुन्हा मुदतवाढ देण्याची नामुष्की

नाशिक : बारा वर्षांपूर्वी राज्य औद्योगिक विकास महामंडळाने बांधलेल्या आयटी पार्कच्या इमारतीला ठेकेदार न मिळण्याची हॅट्ट्रिक झाली आहे. महामंडळाने पार्क चालविण्यास देण्यासाठी मागविलेल्या देकाराला केवळ एका ठेकेदाराने प्रतिसाद दिला असून, त्यामुळे १६ मेपर्यंत निविदेस मुदतवाढ देण्याची नामुष्की आली आहे. परंतु या घोळामुळे पार्क सुरू होण्याची शक्यता पुन्हा दुरावली आहे.बारा वर्षांपूर्वी महामंडळाने अतिरिक्त अंबड औद्योगिक वसाहतीत आयटी पार्क बांधला असून तो लिजने चालविण्यासाठी महामंडळाने याच महिन्यात निविदा प्रसिद्ध केली होती. यापूर्वी महामंडळाने निविदा मागवताना पार्कची तीन मजली इमारत आणि त्यालगतचा भूखंडदेखील समाविष्ट करून देकार मागविले होते. मात्र, त्यासाठी किमान सरकारी किंमत जास्त होती. यंदा मात्र, हा भूखंड अ‍ॅमॅनिटिज प्लॉट असल्याचे सांगून तो वगळण्यात आला. आणि किमान सरकारी किंमत घटविल्याचा दावा करण्यात आला होता त्यानुसार ५ कोटी ८७ लाख रुपये अशी किमान सरकारी रक्कम दाखविण्यात आली होती. मात्र, दोन कोटी २३ लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेली ही इमारत घसारा तर दूरच उलट बांधकामावर दरवर्षी १२ टक्के व्याज दर्शवून भाड्याची किंमत पाच कोटी ८७ लाख रुपये करण्यात आल्याने कितपत प्रतिसाद मिळेल याबाबत साशंकता होती. ‘लोकमत’ने याबाबत अधिकाऱ्यांच्या मानसिकतेतुळे आयटी पार्कचा लिलाव वादात सापडल्याचे स्पष्ट केले होते. अखेरीस हेच खरे ठरले आहे. २६ एप्रिलपर्यंत म्हणजेच देकार सादर करण्याच्या अखेरच्या दिवशी केवळ एकच निविदा प्राप्त झाल्याने अखेरीस निविदांसाठी मुदत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार १६ मेपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)