शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

कोरोना संकटाच्या काळात कंत्राटी कर्मचारी वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 19:45 IST

पाणीपुरवठा व स्वच्छता विभागात १५ वर्षांपूर्वी राज्यात प्रत्येक जिल्ह्यात स्वच्छता कक्षाची स्थापना करण्यात आली. त्यामध्ये एम. एम.सी.जे., एमएसडब्ल्यू, बी.कॉम, एम.कॉम, बीई सिव्हिल, एम.एस्सी, पदवीधर अशा उच्चशिक्षित कर्मचा-यांची

ठळक मुद्दे१३०० कर्मचारी उघड्यावर : पाणीपुरवठा विभागाचा निर्णय३१ जुलैनंतर या कर्मचा-यांच्या सेवा संपुष्टात

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शासनाच्या पाणी व स्वच्छता विभागांतर्गत जिल्हा व तालुकास्तरावर असलेल्या कंत्राटीपद्धतीने कार्यरत असलेल्या सुमारे बाराशे कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कु-हाड कोसळली असून, ऐन कोरोनाच्या संकटकाळात ३१ जुलैनंतर या कर्मचा-यांच्या सेवा संपुष्टात आणण्याचे पत्र शासनाने सर्व जिल्हा परिषदांना पाठविले आहे. गेल्या १५ वर्षांपासून काम करणा-या कर्मचा-यांना महाविकास आघाडी शासनाकडून या कर्मचा-यांना न्याय मिळण्याची अपेक्षा असताना शासनाने आउटसोर्सिंगद्वारे सदरचे अभियान राबविण्याचे ठरविल्याने कंत्राटी कर्मचा-यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

पाणीपुरवठा व स्वच्छता विभागात १५ वर्षांपूर्वी राज्यात प्रत्येक जिल्ह्यात स्वच्छता कक्षाची स्थापना करण्यात आली. त्यामध्ये एम. एम.सी.जे., एमएसडब्ल्यू, बी.कॉम, एम.कॉम, बीई सिव्हिल, एम.एस्सी, पदवीधर अशा उच्चशिक्षित कर्मचा-यांची जाहिराती देऊन आणि लेखीपरीक्षा, मुलाखती घेऊन १२०० कंत्राटी भरती करण्यात आली. स्वच्छता अभियानाबरोबर पाणी व स्वच्छता विभागाचे उपक्रम राबविण्यात या कर्मचा-यांचा मोठा वाटा आहे. अत्यल्प मानधनात शासनाच्या कोणत्याही सुविधा नसताना शासन आपल्या कामाची दखल घेईल या आशेवर काम करीत असताना केंद्र शासनाने जलजीवन अभियान तसेच स्वच्छ भारत अभियान टप्पा-२ची घोषणा केली. या अभियानात मानधनावर काम करणा-या कर्मचा-यांची सेवा कायम करण्याऐवजी त्यांच्या सेवा खंडित करून आउटसोर्सिंगद्वारे ठेकेदार नेमून काम करण्याचा शासनाचा इरादा असल्याचे कर्मचा-यांचे म्हणणे आहे. ठेकेदाराचे पोट भरण्यासाठी तसेच मानधनावरील कर्मचा-यांना बेरोजगार करून त्यांची ससेहोलपट करून घेण्याचे हे षडयंत्र असल्याने याबाबत कंत्राटी कर्मचा-यांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या कंत्राटी कर्मचा-यांनी आजमितीला गृहकर्ज घेतले आहे. मुलांच्या शिक्षणावर खर्च सुरू आहे. कोणी घराचे भाडे भरत आहेत. महागाईच्या काळात तुटपुंज्या वेतनात आपली व आपल्या परिवाराची उपजीविका हे ठोक मानधनावरील कर्मचारी चालवित आहेत, अशा परिस्थितीत त्यांच्यावर बेकारीची कु-हाड कोसळणार आहे.

टॅग्स :Waterपाणीnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद