शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पावसाचा जोर कायम

By admin | Updated: July 4, 2017 00:17 IST

३० टक्के पर्जन्यवृष्टी : धरण साठ्यात वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, मालेगाव व नांदगाव तालुका वगळता अन्य तालुक्यांमध्ये सलग तिसऱ्या दिवशीही हजेरी कायम ठेवल्याने जिल्ह्णाच्या एकूण वार्षिक सरासरीच्या तुलनेत जुलैच्या पहिल्या आठवड्यातच ३० टक्के पाऊस नोंदविला गेला आहे. पावसाच्या संततधारेमुळे जिल्ह्णातील धरणांच्या साठ्यातही कमालीची वाढ होऊन २३ टक्के साठा शिल्लक आहे. सोमवारी सकाळी काहीशी विश्रांती घेतल्यामुळे नागरिकांना सूर्यदर्शन घेता आले, त्यानंतर मात्र पावसाने दुपारी पुन्हा हजेरी लावल्याने नागरिकांची काहीशी धावपळ उडाली. अनेकांनी पावसापासून बचावासाठी सुरक्षित आसरा शोधला. दिवसभर अधूनमधून हजेरी लावलेल्या पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला. नाशिकसह जिल्ह्णातील सर्वच तालुक्यांमध्ये पावसाने कमी-अधिक प्रमाणात हजेरी कायम ठेवल्याने शेतीकामांनी वेग घेतला असून, विशेष करून इगतपुरी, पेठ, त्र्यंबक, सुरगाणा या भागात भाताची आवणी केली जात आहे तर अन्य ठिकाणी मका व सोयाबीनच्या लागवडीत शेतकरी व्यस्त झाला आहे. नांदगाव, मालेगाव, बागलाण या तालुक्यांकडे पावसाने वक्रदृष्टी केल्यामुळे तेथील पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. गेल्या चोवीस तासांत म्हणजेच सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्णात ३१२ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली असून, जुलै महिन्याच्या एकूण पावसाचा विचार करता दोन दिवसातच १७ टक्के पाऊस झाला आहे. जुलै महिन्याची सरासरी ५६७१ मिलिमीटर इतकी असून, त्यापैकी दोन दिवसात ९९८ मिलिमीटर पाऊस झाल्याची आकडेवारी शासकीय यंत्रणेने दिली आहे. जून व जुलै या दोन महिन्यांच्या पावसाचा विचार करता वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत ३० टक्के पाऊस नोंदविला गेला आहे. गेल्या वर्षी हेच प्रमाण फक्त आठ टक्के इतके होते. तालुकानिहाय पर्जन्यवृष्टीजिल्ह्णात गेल्या चोवीस तासांत झालेला पाऊस पुढीलप्रमाणे- कंसात आजवर झालेला एकूण पाऊसनाशिक - ४७ (४४५), इगतपुरी - ४७ (९९५), दिंडोरी - १३ (१४५), पेठ - ६४ (५४४), त्र्यंबकेश्वर - ३० (६६९), मालेगाव - ०(१३६), नांदगाव - १२ (२०३), चांदवड - ६ (१९६), कळवण - १९ (१४२), बागलाण- २ (११६), सुरगाणा - ५३ (४४९), देवळा - १ (९८), निफाड - ६ (११४), सिन्नर- ३ (१६२), येवला- ८ (११९) मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दारणा धरण निम्मे भरलेपावसाच्या समाधानकारक हजेरीमुळे जिल्ह्णातील धरण साठ्यांमध्ये कमालीची वाढ झाली असून, सरासरी २३ टक्के पाणी जिल्ह्णातील धरणांमध्ये उपलबध आहे. नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ३८ टक्के तर संपूर्ण धरण समूहात २९ टक्के पाणी साठले आहे. इगतपुरी परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे दारणा धरण निम्मे भरले असून, या धरणाच्या क्षमतेच्या ५१ टक्के पाणी साठले आहे. तर भावली धरणही ४७ टक्के भरले आहे. नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यात ८२ टक्के पाणी सध्या शिल्लक आहे. चणकापूर २६ टक्के, गिरणा २६ टक्के, हरणबारी १३ टक्के इतके भरले आहे. टंचाईग्रस्त गावांच्या टॅँकरचा फेरआढावाटंचाईग्रस्त गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या टॅँकरची मुदत जूनअखेर संपुष्टात आल्याने जिल्ह्णातील ३१ टॅँकर गेल्या तीन दिवसांपासून बंद करण्यात आल्याने पाच तालुक्यांतील १०५ गावे, वाड्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून, जिल्हा प्रशासनाने उपविभागीय अधिकाऱ्यांना टंचाईचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.