शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्याचा दूषित धूर ओझरकरांच्या घशात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2022 19:40 IST

ओझर (सुदर्शन सारडा) : येथील कचरा डेपोतील ढीग रात्रीच्या वेळी जाळण्याच्या प्रयोगाने हजारो नागरिक त्रस्त झाले आहे. धुराचे लोळ सगळ्या गावात जात असल्याने नागरिकांना श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने अनेकांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.त्यामुळे सुखाच्या झोपेत दुर्गंधीयुक्त प्राणवायूमुळे अनेकांना गंभीर आजार जडण्याची भीती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देजीवघेणा प्राणवायू : हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात

सुदर्शन सारडा

ओझर : येथील कचरा डेपोतील ढीग रात्रीच्या वेळी जाळण्याच्या प्रयोगाने हजारो नागरिक त्रस्त झाले आहे. धुराचे लोळ सगळ्या गावात जात असल्याने नागरिकांना श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने अनेकांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.त्यामुळे सुखाच्या झोपेत दुर्गंधीयुक्त प्राणवायूमुळे अनेकांना गंभीर आजार जडण्याची भीती निर्माण झाली आहे.सध्या ओझर येथे सर्वाधिक चर्चेचा मुद्दा उपस्थित होतोय तो म्हणजे कचरा जाळण्यामुळे होणाऱ्या त्रासाचा. येथे जुन्या सायखेडा रोड जवळील अनुसया पार्कला लागून असलेल्या कचरा डेपोच्या दुर्गंधीने अनेक जण हैराण झाले आहेत. त्यामुळे परिसरात आजारपण वाढण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.ओझर येथे बाणगंगा नदी किनारी मारुती वेस स्मशानभूमी मागे व जुन्या सायखेडा रोडला लागून कचरा डेपो असून, गावातील तसेच उपनगरातील सर्व कचरा हा घंटागाडीने तेथे आणून टाकला जातो. परंतु गावचा वाढता विस्तार व दररोज हजारो किलो जमा होत असलेला ओला व सुका कचरा हा सदर ठिकाणी आणून टाकला जात असताना त्याची विल्हेवाट रात्री जाळून लावण्यात येत असल्याने तो नागरिकांच्या जीवावर उठत आहे. ओला सुका कचरा एक होत असल्याने जागेची प्रचंड कमतरता होत आहे.

कचरा डेपोला लागूनच वसाहत आहे तर नदी पलीकडे शेती व शेलार, शिंदे, कदम वस्ती आहे. या आधीही जेसीबीच्या सहाय्याने डम्पिंग करत असताना त्याची प्रचंड दुर्गंधी नागरिकांना सहन करावी लागली होती. सध्या सायंकाळनंतर दररोज कचरा जाळण्याचे प्रमाण वाढल्याने पसरत असलेल्या धुराचे लोळ दुर्गंधीमुळे नागरिकांचे घराबाहेर पडणे मुश्किल झाल्याने अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सार्वजनिक शौचालय याच ठिकाणी असल्याने कुबट वासाचा सामना लहान मुलांपासून तर वयोवृद्ध लोकांना देखील करावा लागत आहे.

मुख्य गावात सकाळ सायंकाळ धुराची कुबट दुर्गंधी येत आहे.यामुळे लहान बालकांपासून ते आबालवृद्धांपर्यंत अनेकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून अनेकांना दम्याचा त्रास सुरू झाला आहे. यामुळे पाण्यातूनदेखील संसर्गजन्य आजार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सदर डम्पिंग ग्राउंडविषयी नगर परिषद प्रशासनाने गांभीर्याने विचार करून त्वरित पावले उचलण्याची विनंती आता नागरिक करू लागले आहे. जेणेकरून दररोज उद्भवणाऱ्या त्रासापासून सुटका होईल.

टॅग्स :OzarओझरSmokingधूम्रपान