शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहक मंचाने चार बॅँकांना ठोठावला दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 18:54 IST

पेटीत टाकलेल्या धनादेशावर कु ठल्याहीप्रकारची खाडाखोड होत नाही; मात्र या घटनेत खाडाखोड करून नावात बदल करून परस्पर धनादेश दुस-या बॅँकेच्या शाखेत नेऊन टाकला गेला आणि संबंधित बॅँकेने तो वटवून धनादेशावरील रक्कम अदा केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देधनादेशावरील रक्कम दहा टक्के व्याजाने परत करावी प्रथमच घडला असा गंभीर प्रकारधनादेश वटविताना खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे ग्राहक मंचाने म्हटले

नाशिक : बॅँकांनी खातेदारांचे धनादेश वटविण्यापूर्वी संबंधित खातेधारकांशी संपर्क साधून खातरजमा करणे गरजेचे असून, ही बॅँकांची जबाबदारी असल्याचे सांगून ग्राहक मंचाने चार बॅँकांना दंड ठोठावला आहे. धनादेशावरील रक्कम दहा टक्के व्याजाने परत करावी आणि शारीरिक-मानसिक त्रासापोटी पाच हजार व खर्चापोटी तीन हजार असा दंड बॅँकांना ठोठावला आहे.याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, तक्रारदार गणेशमल जगदीशप्रसाद राठी यांनी त्यांच्या खाते असलेल्या बॅँके चा ८० हजार ८५० रुपयांचा धनादेश मयुरेश प्रोटेंज नावाने नाशिकरोड येथील संबंधिताच्या बॅँकेच्या शाखेतून भरला. धनादेश डिपॉझिट पेटीत टाकल्यानंतर त्या धनादेशावरील रक्कम अदा करावयाच्या नावात खाडाखोड करून दुसरे नाव टाकले गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. सदर धनादेश तेथून काढून संबंधित दुसऱ्या नावाच्या व्यक्तीचे खाते शिवाजीनगरच्या एका शासकीय बॅँकेत असल्यामुळे नाशिकरोड येथील त्या बॅँकेच्या शाखेत धनादेश जमा करण्यात आला. शिवाजीनगर शाखेला धनादेश प्राप्त झाल्यानंतर त्याची कुठलीही खातरजमा न करता बॅँकेने खाडाखोडच्या बाबीकडे दुर्लक्ष करत बनावट व्यक्तीच्या नावावर धनादेश वटविला. ही बाब राठी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात धाव घेऊन फसवणुकीची तक्रार दिली. तसेच ग्राहक निवारण मंचाकडे अर्ज करून दाद मागितली. ग्राहक न्यायालयात याप्रकरणी सुनावणी झाली. राठी यांच्या वतीने अ‍ॅड. प्रवीण पारख यांनी बाजू मांडली. ग्राहक मंचाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे, सदस्य प्रेरणा कुलकर्णी, सचिन शिंपी यांनी तक्रारदाराची बाजू रास्त मानली.प्रथमच घडला असा गंभीर प्रकारबॅँकेच्या धनादेश ‘ड्रॉप बॉक्स’मध्ये धनादेश खातेधारकाकडून टाकण्यात आल्यानंतर त्याची नोंद बॅँकेकडे होते. त्यामुळे बॅँकेने ते धनादेश वटविताना खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे ग्राहक मंचाने म्हटले आहे. पेटीत टाकलेल्या धनादेशावर कु ठल्याहीप्रकारची खाडाखोड होत नाही; मात्र या घटनेत खाडाखोड करून नावात बदल करून परस्पर धनादेश दुस-या बॅँकेच्या शाखेत नेऊन टाकला गेला आणि संबंधित बॅँकेने तो वटवून धनादेशावरील रक्कम अदा केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

टॅग्स :NashikनाशिकCourtन्यायालय