शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
3
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
4
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
5
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
6
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
7
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
8
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
9
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
10
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
11
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
12
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
13
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
14
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
15
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
16
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
17
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
18
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
19
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
20
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन

प्रकल्पांच्या खासगीकरणासाठी नेमणार सल्लागार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:06 IST

आयुक्त : फाळके स्मारक, तारांगणबाबत विचार; ट्रक टर्मिनसबाबतही मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : दादासाहेब फाळके स्मारक, तारांगण यांसह विविध प्रकल्प बीओटी (बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा) अथवा पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) या अंतर्गत चालविण्यास देण्यासाठी महापालिकेने सल्लागार नेमण्याचा प्रस्ताव तयार केला असून, तो मान्यतेसाठी येत्या महासभेत ठेवण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी दिली.महापालिकेच्या सन २०१७-१८ या वर्षाच्या अंदाजपत्रकात स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांच्यासह महापौर रंजना भानसी यांनी उत्पन्नवाढीसाठी अनेक उपाययोजना सुचविताना बीओटी अथवा पीपीपी तत्त्वावर प्रकल्प चालविण्यास देण्याची शिफारस केलेली आहे. महापालिकेच्या फाळके स्मारकाची दुरवस्था झालेली आहे. तेथील देखभाल-दुरुस्तीचा खर्चही महापालिकेला परवडेनासा झाला आहे. त्यामुळे फाळके स्मारक खासगी संस्थेला चालविण्यास देण्याची मागणी यापूर्वीही सदस्यांकडून झालेली आहे. तसेच तारांगण प्रकल्पही चालेनासा झाला आहे. महापालिकेने मध्यंतरी तारांगण प्रकल्पाला ऊर्जितावस्था आणण्याचा प्रयत्न केला परंतु, त्यात फारसे यश आलेले नाही. याशिवाय, शहरातील मनपाच्या मालकीच्या यशवंत मंडईसारख्या जुन्या इमारती पाडून त्याठिकाणी बीओटीवर वाहनतळ साकारण्याचीही मागणी पुढे आलेली आहे. ट्रक टर्मिनसही भाड्याने देण्याची मागणी झालेली आहे.रस्ते सुरक्षेचाही प्रस्तावशहरातील रस्ते सुरक्षेबाबतचाही प्रस्ताव प्रशासनाने तयार केला असून, तोसुद्धा येत्या महासभेत मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे. अनेक रस्त्यांची रचना करताना त्यामध्ये निर्माण होणाऱ्या धोक्यांचा विचार करण्यात आलेला नाही. त्यामुळे ज्याठिकाणी वारंवार अपघात घडतात अथवा धोकादायक स्थिती आहे, त्या रस्त्यांचे नव्याने डिझाइन तयार करत आवश्यक ते बदल केले जाणार असल्याचे आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी सांगितले. विविध प्रकल्पांच्या खासगीकरणाचा विचार पुढे येत असताना महापालिका प्रशासनाने त्याबाबत सल्लागार नियुक्तीचा प्रस्ताव तयार केला असून, सदर सल्लागार संबंधित प्रकल्पांचे प्राकलन तयार करत त्याच्या अंमलबजावणीविषयी सूचना करणार आहेत. सदरचा प्रस्ताव आयुक्तांकडून येत्या गुरुवारी (दि.२०) होणाऱ्या महासभेत सादर केला जाणार आहे.मनपाच्या यशवंत मंडईसारख्या जुन्या इमारती पाडून त्याठिकाणी बीओटीवर वाहनतळ साकारण्याचीही मागणी पुढेआलेली आहे.