शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

नांदगावी नवीन पादचारी पुलाचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 01:22 IST

नांदगाव येथील रेल्वेस्थानकावर असलेला ब्रिटिशकालीन पादचारी पूल लवकरच इतिहासजमा होणार असून, त्यापासून काही अंतरावर नवीन अधिक क्षमतेचा पादचारी पूल बनविण्यात येणार आहे. नवीन पुलाचे काम सुरू करण्यात आले आहे.

ठळक मुद्देआता उरल्या आठवणी : ब्रिटिशकालीन पादचारी पूल इतिहासजमा

नांदगाव : येथील रेल्वेस्थानकावर असलेला ब्रिटिशकालीन पादचारी पूल लवकरच इतिहासजमा होणार असून, त्यापासून काही अंतरावर नवीन अधिक क्षमतेचा पादचारी पूल बनविण्यात येणार आहे. नवीन पुलाचे काम सुरू करण्यात आले आहे.सध्या उपयोगात असलेल्या ब्रिटिशकालीन पादचारी पुलावर त्याकाळी ज्या कंपनीने तो बनविला होता, त्या कंपनीचे नाव आहे. ते असे ‘जोसेफ वेस्टवूड लिमिटेड इंजिनिअर्स अ‍ॅण्ड कॉन्ट्रक्टर लंडन’ त्याखाली १९०४ असे साल टाकण्यात आलेले आहे. त्याला शंभर वर्षे पूर्ण झाली तेव्हा सदर ब्रिटिश कंपनीकडून रेल्वेला पत्र आले. ‘आम्ही दिलेल्या हमीनुसार पुलाचे आयुष्य आता संपले आहे. यापुढे आमची जबाबदारी उरली नाही’ अशा आशयाचे ते पत्र होते. कामाची जबाबदारी १०० वर्षे घेणाऱ्या ब्रिटिश कंपनीच्या त्या पत्राची खूप चर्चा झाली होती. त्यानंतर २०२० पर्यंत लाखो प्रवाशांना आपल्या अंगावरून वाहणारा हा पूल अद्यापही दिमाखात उभा आहे. पुलाच्या कठड्यावर अलीकडे सुरक्षेसाठी जाळी लावण्यात आल्याने कंपनीचे नाव जाळीमागे गेले आहे. एकेकाळी धुरांच्या रेषा सोडत येणारी मामाची गाडी. ज्यांनी या पुलावर उभे राहून बघितली होती. त्यांच्या फक्त आठवणी उरणार आहेत.एक नंबरच्या प्लॅटफॉर्मवर नवीन पुलाचा पाया खणण्याचे काम सुरू झाले आहे. तो सध्याच्या पुलापेक्षा अधिक रु ंद व भव्य असेल, मात्र त्या पुलाचा रस्ता शहरातून येणाऱ्यांसाठी काहीसा दूर मालधक्क्यातून येणारा असणार आहे. दोन नंबरच्या फलाटावर अप बाजूचा सिग्नल मागे सरकणार आहे.

टॅग्स :railwayरेल्वे