शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

सटाण्यात विहिरीचे बांधकाम कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 18:02 IST

सटाणा : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ठेंगोडा येथील गिरणा नदीपात्रातील विहिरीचे गेल्या चार महिन्यांपूर्वी लाखो रु पये खर्चून केलेले बांधकाम अचानक कोसळल्याने शहराचा पाणीपुरवठाही विस्कळीत झाला आहे. या निकृष्ट दर्जाच्या विहीर बांधकामाची चौकशी करून संबधित ठेकेदाराविरु द्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक मनोज सोनवणे यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.

शहरासाठी तालुक्यातील ठेंगोडा येथील गिरणा नदीपात्रातून पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली आहे. पुरेसा पाणीपुरवठा व्हावा म्हणून पालिकेने ६८ लाख ८१ हजार रु पये खर्चून नदीपात्रात नव्याने विहीर खोदण्यात आली. या ९ मीटर व्यास असलेल्या विहिरीच्या बांधकामासाठी पालिकेने चाळीस लाख रुपयांची निविदा काढली होती. गेल्या चार महिन्यांपुर्वी संबधित ठेकेदाराने हे बांधकाम पूर्ण केले. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी अचानक बांधकाम कोसळल्याने विहीर मातीने भरून आली आहे. या विहिरीतून पाणीपुरवठा होत नाही म्हणून माजी पाणीपुरवठा सभापती मुन्ना शेख यांनी अचानक विहिरीची पाहणी केल्याने हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. तांत्रिकदृष्टया या विहिरीचे काम सदोष असल्यामुळे विहिरीला भगदाड पडून बांधकाम कोसळल्याचे उघडकीस आले. नदीला पूर आल्याने बांधकाम पूर्णपणे कोसळून विहीर मातीने भरून आली आहे. या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पालिकेचे एक कोटी ९ लाख रु पये अक्षरश: पाण्यात गेले असून सबंधित कामाची चौकशी करावी अशी मागणी पुढे आली आहे.एका विहिरीवर कोटीहून अधिक रु पये पालिकेने खर्च केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. याच नदीपात्रात अनेक शेतकºयांच्या विहिरी आहेत. पालिकेने एका विहिरीवर केलेल्या खर्चात शेतकरी अशा पाच विहीर खोदून शेतात पाईप लाईनने पाणी नेल्याची उदाहरणे ेआहेत. मात्र पालिकेने एवढा खर्च करूनही पाणी निघू न शकल्याने पालिका प्रशासन संशयाच्या भोवºयात सापडले आहे. विहिरी खोलाई ,बांधकाम , पंप खरेदी हे प्रशासनासाठी कुरण असल्याचेही बोलले जात आहे.कोट...अधिकारी, पुढारी आणि ठेकेदार या त्रिकुटामुळेच पालिकेचे एक कोटी रु पये अक्षरश: वाया गेले आहेत.या निकृष्ट दर्जाच्या कामाची गुणवत्ता नियंत्रण विभागामार्फत चौकशी करून संबधित ठेकेदाराविरु द्ध गुन्हा दाखल करावा .हा जनतेचा पैसा असून निकृष्ट दर्जाचे काम करून जनतेची एकप्रकारे फसवणूक केली आहे.- मनोज सोनवणे, माजी नगरसेवकविहिरीच्या बांधकामाची मुख्याधिकारी व संबंधित अधिकाºयांना सोबत घेऊन पाहणी केली आहे. बांधकामाबद्दल संबधित ठेकेदाराला तंबी दिली आहे.नदीला पूर असल्यामुळे काम करण्यास मोठा अडथळा येत असून काम पूर्ण होईपर्यंत संबधित ठेकेदाराचे उर्वरित बिल रोखण्यात आले आहे.- सुनील मोरे, नगराध्यक्ष, सटाणा

टॅग्स :Accidentअपघात