शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

बांधकाम नियमितीकरण; मुदतवाढीसाठी तगादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 00:50 IST

महाराष्ट नगररचना प्रशमित संरचना धोरण २०१७ अंतर्गत ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीचे अनधिकृत बांधकाम नियमितीकरणासाठी ३१ मे २०१८ पर्यंत मुदत देण्यात आली असली तरी, मुदतीत प्रकरणे सादर करणे अवघड असल्याने महापालिकेने मुदतवाढीसाठी महासभा बोलावून तसा ठराव राज्य शासनाकडे पाठविण्याची मागणी नगरसेवकांमधून जोर धरू लागली आहे.

नाशिक : महाराष्ट नगररचना प्रशमित संरचना धोरण २०१७ अंतर्गत ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीचे अनधिकृत बांधकाम नियमितीकरणासाठी ३१ मे २०१८ पर्यंत मुदत देण्यात आली असली तरी, मुदतीत प्रकरणे सादर करणे अवघड असल्याने महापालिकेने मुदतवाढीसाठी महासभा बोलावून तसा ठराव राज्य शासनाकडे पाठविण्याची मागणी नगरसेवकांमधून जोर धरू लागली आहे.  अनधिकृत बांधकामे नियमितीकरणासाठी आता अवघे नऊ दिवस उरले असून, आतापर्यंत महापालिकेच्या नगररचना विभागाकडे सुमारे ३५० प्रकरणे दाखल झालेली आहेत. परंतु, प्रकरणे सादर करताना ना हरकत दाखले मिळविण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे, सदर धोरणानुसार नियमितीकरणासाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी जोर धरू लागली असून, त्यासाठी ठराव करण्याकरिता विशेष महासभा बोलाविण्यासंदर्भात नगरसेवकांनी महापौरांकडे तगादा लावला आहे. भिवंडी निजामपूर महापालिकेने यापूर्वीच सदर धोरणांतर्गत सहा महिन्यांची मुदतवाढ राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून मंजूर करून आणली आहे. त्यामुळे भिवंडीत आॅक्टोबर २०१८ पर्यंत प्रस्ताव स्वीकारले जाणार आहेत. नाशिक महापालिकेनेही सदर धोरणांतर्गत नियमितीकरणाचे प्रस्ताव सादर करण्यासाठी मुदतवाढीसाठी प्रयत्न करावे आणि ३१ मे २०१८ पूर्वी विशेष महासभा बोलावून तसा ठराव नगरविकास विभागाकडे पाठवावा, अशी मागणी होत आहे. शहरातील बांधकाम व्यावसायिकांनीही शासनस्तरावर आपले वजन वापरून मुदतवाढीचे प्रयत्न चालविले आहेत. सत्ताधारी भाजपाचे पदाधिकारी मात्र याबाबत शांत बसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात  आहे. याशिवाय, महापालिकेने येत्या १ जूनपासून शहरातील १६६ अनधिकृत लॉन्सवरही हातोडा चालविण्यात येणार असल्याचे जाहीर केल्याने त्यालाही मुदतवाढ मिळावी यासाठी लॉन्सचालकांकडून प्रयत्न केले जात आहेत. परंतु, सध्या आचारसंहितेमुळे महापालिकेत कुणीही पदाधिकारी फिरकत नसल्याने त्यांच्यापुढे गाºहाणे मांडणे मुश्कील झाले आहे.करवाढीचा : मुद्दा पुन्हा तापणारमहापालिका आयुक्तांनी आपल्या अधिकारात नवीन इमारतींचे करयोग्य मूल्य निश्चित करतानाच त्यात केलेल्या करवाढीविरुद्ध आचारसंहिता संपल्यानंतर पुन्हा एकदा रान पेटण्याची शक्यता आहे. त्यानुसार, अन्याय निवारण कृती समितीमार्फत पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय महासभेनेही सदर करवाढीला स्थगिती देण्याचा ठराव करावा यासाठी नगरसेवकांकडूनही मागणी वाढू लागली आहे. मागील महासभेत केलेला ठराव हा आचारसंहितेच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता असल्याने महापौरांनी तसा ठरावच केलेला नव्हता. आता शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी महासभेने करवाढ स्थगितीचा ठराव करून तो शासनाकडे पाठवावा, अशी मागणी जोर धरत आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका