शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राष्टÑ सेवा दलातर्फे संविधान जागर अभियानाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 00:32 IST

संविधान दिनानिमित्त येथे राष्टÑ सेवा दलाच्या वतीने संविधान जागर अभियानाला प्रारंभ झाला. मोसमपुलावरील महात्मा गांधी पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून शहरातून रॅली काढण्यात आली.

संगमेश्वर : संविधान दिनानिमित्त येथे राष्टÑ सेवा दलाच्या वतीने संविधान जागर अभियानाला प्रारंभ झाला. मोसमपुलावरील महात्मा गांधी पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून शहरातून रॅली काढण्यात आली. शिवाजी महाराज पुतळामार्गे ही रॅली आंबेडकर पुतळ्यापाशी आली. आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी सेवा दल सैनिक तेजस्विनी पवार हिने संविधानाचे महत्त्व विशद केले. विविध घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.  या. ना. जाधव विद्यालयाच्या प्रांगणात यानिमित्त विशेष कार्यक्रम झाला. विद्यार्थिनी अवनी वाणी व साक्षी वाघ यांनी संविधानातील कर्तव्याचे वाचन करून ते समजून सांगितले. उपस्थित सर्वांना संविधानाची प्रतिज्ञा देण्यात आली. संविधानाने आपल्याला दिलेले अधिकार आणि आपली कर्तव्ये याचे भान प्रत्येक भारतीयाला असले पाहिजे. मात्र आज काही हिंसक लोकांतर्फे संविधानाने दिलेली हमी व मूल्येच धोक्यात आणली जात आहेत. ती मोडून काढण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे.  अशावेळी संविधानातील मूल्यांप्रती सजग राहण्यासाठी राष्टÑ सेवा दलातर्फे महाराष्टÑभर २६ नोव्हें. ते २६ जानेवारी २०१८ असे दोन महिने जागर अभियान राबविले जात असल्याचे जिल्हा कार्याध्यक्ष अ‍ॅड. भास्कर तिवारी यांनी यावेळी सांगितले. डॉ. सुगन बरंठ यांनीही मनोगत व्यक्त केले.  यावेळी अशोक फराटे, संतोष पवार, प्रवीण वाणी, राजेंद्र जाधव, राजीव वडगे, सुभाष परदेशी, राजेंद्र भोसले, किरण सोनवणे, प्रवीण गायकवाड, सुधीर साळुंके, अशोक पठाडे, विकास मंडळ आदींसह कॅम्प व संगमेश्वर शाखेतील सैनिक उपस्थित होते. कार्यकर्त्यांचा मेळावा संगमेश्वर : इतर मागासवर्गीय समाजासाठी क्रांतिकारी ठरलेला मंडल आयोग आंदोलन तसेच मराठवाडा विद्यापीठास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ नामांतर आंदोलनात सक्रीय सहभाग घेतलेल्या कार्यकर्त्यांचा मेळावा मंगळवारी २८ नोव्हेंबर रोजी महात्मा जोतिबा फुले स्मृतिदिनी आयोजित केला आहे. सत्यशोधक युवा सभा, सम्राट मंडळ व समविचारी संस्था, पथ संघटना यांच्या सहकार्याने हा अभिनव मेळावा होणार आहे. मालेगाव, नांदगाव, मनमाड, येवला, सिन्नर, नाशिक येथील सुमारे शंभरावर कार्यकर्ते यावेळी उपस्थित राहतील. दिवसभर कार्यकर्त्यांचे स्नेहसंमेलन होईल, अशी माहिती संयोजक सुभाष परदेशी यांनी दिली. सायंकाळी ५ वाजता ‘क्रांतिकारी महात्मा’ हा एकपात्री प्रयोग प्रा. नवनाथ शिंदे (कोल्हापूर) सादर करतील.