शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

संविधान जाळून अवमान : विविध संघटनांकडून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 00:36 IST

दिल्ली जंतरमंतर येथे संविधान जाळून अवमान करणाऱ्या समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी विविध पक्ष व संघटनांच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयात देण्यात आलेल्या निवेदनात केली आहे.

नाशिकरोड : दिल्ली जंतरमंतर येथे संविधान जाळून अवमान करणाऱ्या समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी विविध पक्ष व संघटनांच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयात देण्यात आलेल्या निवेदनात केली आहे.  विभागीय उपायुक्त रघुनाथ गावंडे यांना मिलन मित्रमंडळाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लोकसभा सभागृहात अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट हा कडक केला. त्या विरोधात काही श्रीनिवास पांडे व त्यांचे सहकारी यांनी दिली येथील जंतरमंतर मैदांनावर घोषणा देऊन भारतीय संविधान जाळून अवमान केला. संबंधित समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर आकाश भालेराव, अविनाश वाघ, रवि वाघमारे, संजय भालेराव, मनोज वाघ, सागर सोनकांबळे, अंकुश चौधरी, आकाश अहेर, सागर जाधव, कन्हैया केदारे, गौतम धावरे, अक्षय वाकडे, अमोल इंगळे आदींच्या सह्या आहेत. रिपब्लिकन सेनेच्या वतीने विभागीय उपायुक्त रघुनाथ गावंडे यांना दिल्ली येथे संविधान  जाळणाºया समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई करावी या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर प्रकाश बागुल, संजय दोंदे, राजाभाऊ दोंदे, इंद्रजित भालेराव, राहुल बागुल, विलास गांगुर्डे, रविकांत भालेराव, विजय भालेराव, अमोल घोडे, रामा निकम, बापू लोखंडे, अमोल घोडे, उन्मेश थोरात आदींच्या सह्या आहेत.तसेच बहुजन रयत परिषदेच्या वतीने गावंडे यांना देण्यातआलेल्या निवेदनात संविधान जाळणाºयांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर देवेंद्र साळवे, दत्ता खंडाळे, साहेबराव कोळेखे,  सूर्यकांत भालेराव, राकेश सोनवणे, सागर शिरसाठ, अशोक पगारे, विजय साळवे, अनिल बाविस्कर आदींच्या सह्या आहेत.प्रबुद्ध महिला मंडळप्रबुद्धनगर महिला मंडळाच्या वतीने नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांना याबाबत निवेदन देऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. निवेदनावर सुरेखा बाविस्कर, जयश्री सोनकांबळे, दीपाली वाघ, सविता आढाव, किरण झनकर, सुनीता पगारे, कलाबाई जाधव, देवूबाई गांगुर्डे, उषा साळवे, मंगल भवार, मंगल खुणे, चंद्रकला मेश्राम, छाया रगडे, मीरा पगारे, मथुरा वाघ, मंदाबाई वाघ, सुनीता पगारे आदींच्या सह्या आहेत.

टॅग्स :commissionerआयुक्तNashikनाशिक