शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

टोकियो आॅलिम्पिकपासून दूर ठेवण्याचे षडयंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 01:04 IST

नाशिक : टोकियो येथे २०२० मध्ये होणाऱ्या आॅलिम्पिक स्पर्धांपासून आपल्याला दूर ठेवण्यासाठी खोटे आणि बेकायदेशीर आरोप करून आपले लक्ष विचलित करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप आंतरराष्ट्रीय रोर्इंगपटू दत्तू भोकनळ यांनी केला आहे.

ठळक मुद्देदत्तू भोकनळ : कट असल्याचा आरोप

नाशिक : टोकियो येथे २०२० मध्ये होणाऱ्या आॅलिम्पिक स्पर्धांपासून आपल्याला दूर ठेवण्यासाठी खोटे आणि बेकायदेशीर आरोपकरून आपले लक्ष विचलित करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप आंतरराष्ट्रीय रोर्इंगपटू दत्तू भोकनळ यांनी केला आहे.दत्तू भोकनळ यांची पत्नी आशा दत्तू भोकनळ हिने दत्तूविरोधात फसवणूक केल्याची फिर्याद आडगाव पोलीस ठाण्यात दिल्यानंतर दत्तू भोकनळ याला बुधवारी सत्र न्यालायाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर दत्तूने गुरुवारी (दि.३०) त्यांच्या वकीलाच्या चेंबरमध्ये पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हा आरोप करतानाच याची सुरुवात आपल्याकडे पैशाची मागणी करण्यापासून झाल्याचे सांगितले. याविषयीचे अधिक सत्य न्यायालयातून सर्वांसमोर येणार असल्याचे सांगितले. दत्तू भोकनळ याच्यावर त्याच्या पत्नीने आळंदी येथे आपल्याशी वैदिक पद्धतीने लग्न करून नातेवाइकांसमक्ष लग्न करण्याचे आश्वासन पाळले नसल्याचा आरोप करीत फसवणुकीची फिर्याद केली आहे.दत्तूने दिलेल्या आश्वासनानुसार आपण व आपल्या कुटुंबीयांनी दोनदा लग्नाची तयारी करूनही दत्तूने लग्नासाठी न पोहोचता नातेवाइकांसमोर लग्नास नकार देत आपली फसवणूक केल्याचा आरोप करीत आशा भोकनळ यांनी या फिर्यादीतून केल्यामुळे दत्तू विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हे प्रकरण न्यायालयात दाखल झाल्यानंतर न्यायालयाने बुधवारी दत्तूला सशर्त जामीन मंजूर केला. न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान करणार असल्याचे सांगतानाच सध्या आपण टोकियो आॅलिम्पिक २०२०ची तयारी करीत असून, आपल्यासमोर केवळ देशासाठी पदक मिळविण्याचेच ध्येय आहे़-दत्तू भोकनळ, रोर्इंगपटू