मालेगाव : तालुक्यातील देवारपाडे येथे खासदार तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी रंगनाथ म्हस्के या आत्महत्त्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मयत शेतकऱ्याचे वडील काशीनाथ म्हस्के, पत्नी राधाबाई, मुलगा अतुल व प्रदीप यांचे सांत्वन केले. रंगनाथ म्हस्के यांनी कर्जबाजारीला कंटाळून आत्महत्त्या केली होती. यावेळी चव्हाण यांनी शेतकऱ्यांंना आत्महत्त्या करू नका, कॉँगे्रस तुमच्या पाठीशी आहे, असे आश्वासन दिले. या दौऱ्यात आमदार आसिफ शेख, प्रसाद हिरे, तुषार शेवाळे, सुचेता बच्छाव, चंद्रकांत गवळी, केवळ हिरे आदि सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
देवारपाडे येथील मस्के कुटुंबीयांचे चव्हाण यांच्याकडून सांत्वन
By admin | Updated: September 12, 2015 22:20 IST