शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता नाशिकमध्येही दक्षता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2021 00:06 IST

नाशिक: शहरासह जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात रोजच कोरोनाचा धोका वाढत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी कारवाईचा बडगा उगारतानाच पुन्हा एकदा वैद्यकीय सज्जता सुरू करण्यात आली आहे. रविवारी (दि. २८) यासंदर्भात मुख्यमंत्री विशेष बैठक घेणार असून, त्यात काय निर्णय होतो यावर प्रशासनाची दुसरी दिशा ठरणार आहे.

ठळक मुद्देतिसऱ्या लाटेची तयारी: आरोग्य नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर उगारणार बडगा

नाशिक: शहरासह जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात रोजच कोरोनाचा धोका वाढत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी कारवाईचा बडगा उगारतानाच पुन्हा एकदा वैद्यकीय सज्जता सुरू करण्यात आली आहे. रविवारी (दि. २८) यासंदर्भात मुख्यमंत्री विशेष बैठक घेणार असून, त्यात काय निर्णय होतो यावर प्रशासनाची दुसरी दिशा ठरणार आहे.

कोरोनाचा ओमिक्रॉन हा नवा व्हेरियंट आफ्रिकेत आढळल्याने पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर नाशिक शहरासह जिल्ह्यात निर्बंध शिथिल करण्यात आले. मात्र त्यानंतर बाजारपेठा, लग्न सोहळे, राजकीय कार्यक्रम यामुळे गर्दी वाढली असून त्यात आरोग्य नियमांचे पालन होत नसल्याचे आढळले आहे. महापालिकेने मध्यंतरी शहरात आरोग्य नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सुरू केलेली कारवाई पुन्हा सुरू केली असून गेल्या काही दिवसात रुग्णांची संख्या कमी- अधिक होत आहे. त्यातच नवीन व्हेरियंटची चर्चा सुरू झाल्याने महापालिका आयुक्तांनी गांभीर्याने घेतले आहे. शहरातील मंगल कार्यालये आणि लॉन्सवर लग्न सोहळ्यात गर्दी होत असल्याने आरोग्य नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेने १८ पथके तैनात केली आहेत.नाशिकमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची अगोदरच पूर्वतयारी करण्यात आली आहे. महापालिकेची दोन रुग्णालये आणि कोविड सेंटर्स येथे ऑक्सिजनची देखील सोय करण्यात आली आहे. त्यामुळे वैद्यकीय सज्जता झाली असली तरी शासन आता त्यावर काय निर्देश देते त्यावर पुढील कार्यवाही अवलंबून आहे.महापालिकेने वैद्यकीय तयारी पूर्णपणे केली असून ऑक्सिजनचा पुरवठा मुबलक होईल अशा प्रकारची व्यवस्था केली आहे. मात्र, नागरिकांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याची वेळच येऊ नये, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.- कैलास जाधव, आयुक्त, महापालिकाआठवडाभरात आढळलेले रुग्ण२१ नोव्हेंबर- ५२२२ नोव्हेंबर- ४५२३ नोव्हेंबर- ६६२४ नोव्हेंबर- ५१२५ नोव्हेंबर- ५१२६ नोव्हेंबर -३४२७ नोव्हेंबर- ६५

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसhospitalहॉस्पिटल