शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्यांच्या मदतीने शंभरावर रोपट्यांचे संवर्धन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 23:54 IST

सिन्नर : दापूरच्या खांडवाडीतील एक तरुण भर उन्हाळ्यात बाल सवंगड्यांच्या मदतीने जवळपास सव्वाशे झाडांचे संवर्धन करीत आहे. अजय कडाळे असे त्याचे नाव असून लहानपणापासून त्याची वृक्षांशी मैत्री जडली आहे. त्यामुळे खांडवाडीतील त्याच्या घराचा परिसरही नंदनवन भासतो आहे.

सिन्नर : दापूरच्या खांडवाडीतील एक तरुण भर उन्हाळ्यात बाल सवंगड्यांच्या मदतीने जवळपास सव्वाशे झाडांचे संवर्धन करीत आहे. अजय कडाळे असे त्याचे नाव असून लहानपणापासून त्याची वृक्षांशी मैत्री जडली आहे. त्यामुळे खांडवाडीतील त्याच्या घराचा परिसरही नंदनवन भासतो आहे.अजय दापूर ग्रामपंचायतीमध्ये ग्रामरोजगार सेवक म्हणून काम करतो. खांडवाडीतील त्याच्या राहत्या घरापासून अर्धा किमीच्या आसपास वनविभागाचे क्षेत्र आहे. या ठिकाणी आंबा, सुबाभूळ, वड, चाफा, बोर, जांभूळ, सीताफळ, कडुनिंब, करंजी, चिंच, बकाण अशा विविध प्रकारच्या वृक्षांची त्याने लागवड केली आहे. आणि या झाडांचे संवर्धन करण्यासाठी तो जीव ओतून काम करत आहे.मुळात अजयची लहानपणापासून झाडांशी मैत्री आहे असे तो सांगतो. राहत्या घराच्या मागेपुढे त्याने फणस, नारळ, रामफळ, चाफा, केळी, पेरु अशी नानाविध फळझाडे लावलेली आहेत. घराच्या सभोवताली झाडे लावण्यासाठी जागा नसल्याने त्याने वनविभागाच्या जागेत स्वत: पुढाकार घेऊन सव्वाशे झाडे लावली.वनविभागाने याबाबत विचारणा केली. तथापि, अजयचा हेतू स्वच्छ असल्याने वनविभागाने त्याला प्रोत्साहन दिले. उन्हाच्या झळा वाढल्यानंतर तो दररोज वाडीतील बालसंवगडी अथवा घरातील चिलीपिली सोबत घेतो आणि सायकलला पाण्याने भरलेले ड्रम बांधून वृक्षसंवर्धनाची जबाबदारी पार पाडतो. सव्वाशे झाडांपैकी जवळपास ९० टक्के झाडे जगविण्यात त्याच्या ‘ग्रीन आर्मी’ला यश आले आहे. यंदाच्या पावसाळ्यात झाडे अधिक बाळसे धरतील असा विश्वास अजयला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक