शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

विकासाकडे कानाडोळा : वडाळा-डीजीपीनगर ट्रॅक संपुष्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 17:10 IST

नाशिक : वडाळागाव येथील म्हसोबा मंदिरापासून पुढे थेट टागोरनगरपर्यंत जॉगिंग ट्रॅक काही वर्षांपूर्वी विकसित केला गेला. या ट्रॅकची अवस्था ...

ठळक मुद्दे टवाळखोर, मद्यपी, भुरट्या चोरांचा येथे ठिय्या असतो. ट्रॅक नसून केवळ उजव्या कालव्याची ओसाड जागा दृष्टीस पडतेजॉगिंग ट्रॅकवरील पथदीपांचे नुकसान झाले

नाशिक : वडाळागाव येथील म्हसोबा मंदिरापासून पुढे थेट टागोरनगरपर्यंत जॉगिंग ट्रॅक काही वर्षांपूर्वी विकसित केला गेला. या ट्रॅकची अवस्था विघ्नहरण गणेश मंदिरापासून पुढे चांगली जरी असली तरी वडाळा ते डीजीपीनगरपर्यंत जवळपास हा ट्रॅक संपुष्टात आला आहे. या दरम्यान, ट्रॅक नसून केवळ उजव्या कालव्याची ओसाड जागा दृष्टीस पडते.टागोरनगर ते वडाळा म्हसोबा मंदिरापर्यंत सावता माळी पाट रस्त्यालगतच्या उजव्या कालव्याच्या जागेत सुमारे सहा वर्षांपूर्वी जॉगिंग ट्रॅक एका खासगी प्रायोजकाच्या माध्यमातून विकसित केला गेला; मात्र या जॉगिंग ट्रॅकच्या नियमित देखभाल दुरुस्तीकडे कालांतराने काणाडोळा केला गेल्याने जॉगिंग ट्रॅकचे तीन तेरा वाजले आहे. जॉगिंग ट्रॅकच्या दोन्ही बाजूंचे कुंपण नाहीसे झाले आहे. तसेच पाटाच्या जागेवर तयार करण्यात आलेल्या ट्रॅकवरील माती नाहीशी होऊन ट्रॅकभोवती खड्डे पडले असून, गाजरगवताचे साम्राज्य पसरले आहे. जॉगिंग ट्रॅकवरील पथदीपांचे नुकसान झाले असून, काही पथदीप चोरट्यांनी गायब केले आहेत तर काहींचे दिवे फोडण्यात आले आहे. यामुळे रात्रीच्या सुमारास हा संपूर्ण परिसरच अंधारात हरविलेला असतो. यामुळे टवाळखोर, मद्यपी, भुरट्या चोरांचा येथे ठिय्या असतो. ओल्या पार्ट्या मद्यपींकडून रंगविल्या जातात; मात्र गस्तीवरील पोलिसांचे वाहन केवळ सरळ रस्त्याने मार्गस्थ होऊन प्रेमीयुगुलांचा शोध घेण्याच्या प्रयत्नात असतात.विश्रांतीसाठी बीट मार्शल ‘ट्रॅक’वरदुचाकीवरून रात्री गस्तीवर असलेले पोलीस बीट मार्शलदेखील अनेकदा या ‘ट्रॅक’वर रात्री ‘विश्रांती’साठी येत असल्याचे काही नागरिकांनी सांगितले. हा जॉगिंग ट्रॅक सुरक्षित करून नागरिकांची होणारी गैरसोय थांबविण्याची मागणी सातत्याने केली जात असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. जॉगिंग ट्रॅकसाठी अत्यंत प्रशस्त जागा आहे. या ट्रॅकच्या विकासाकडे गांभीर्याने लक्ष घातल्यास आदर्श ट्रॅक उदयास येऊ शकेल; मात्र त्यासाठी राजकीय लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासनाच्या इच्छाशक्तीची गरज आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका