शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांची कर्तव्यनिष्ठा कौतुकास्पद : सिंधूताई सपकाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 00:33 IST

पोलीस हेदेखील गणवेशातील नागरिकच आहेत. आपले कर्तव्य बजावताना इतरांचे वृद्ध आई-वडील, बायका-मुले सुरक्षित रहावीत यासाठी आपल्या कुटुंबाची पर्वा न करता रस्त्यावर उतरतात. त्यातल्या त्यात क्षणोक्षणी दिव्य प्रसंगांचा सामना करणाऱ्या महिला पोलीस कर्मचाºयांच्या जबाबदारीला मी सलाम करते, असे प्रतिपादन अनाथांची माय असलेल्या ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांनी व्यक्त केले.

सिडको : पोलीस हेदेखील गणवेशातील नागरिकच आहेत. आपले कर्तव्य बजावताना इतरांचे वृद्ध आई-वडील, बायका-मुले सुरक्षित रहावीत यासाठी आपल्या कुटुंबाची पर्वा न करता रस्त्यावर उतरतात. त्यातल्या त्यात क्षणोक्षणी दिव्य प्रसंगांचा सामना करणाऱ्या महिला पोलीस कर्मचाºयांच्या जबाबदारीला मी सलाम करते, असे प्रतिपादन अनाथांची माय असलेल्या ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांनी व्यक्त केले. नाशिक येथील कार्यक्रमासाठी जात असताना त्यांनी अचानक अंबड पोलीस ठाण्यास भेट दिली. यावेळी सपकाळ म्हणाल्या, पोलिसांविषयी समाजाने पूर्वग्रहदूषित आकस न बाळगता सद्रक्षणाय खलनिग्रहणाय या पावला-पावलावर परीक्षा घेणाºया ब्रीद वाक्याचा धैर्यपूर्वक सामना करणाºया पोलिसांचा सर्वांनीच आदर करावा. एकीकडे कुटुंबाची जबाबदारी सांभाळून पोलीस सेवेत कर्तव्य बचावणाºया महिला कर्मचाºयांच्या व्यथा स्त्री म्हणून आपण चांगल्याप्रकारे जाणून आहोत. समाज कसाही वागला तरी महिला पोलिसांनी आपले कर्तव्य बजवावे, तसेच सतत कणखर राहून आपले कार्य निष्ठेने पार पाडावे. मी अनाथांची माय असले तरी महिला पोलीस संपूर्ण समाजाच्या आई आहेत, असेही सिंधूताई सपकाळ यांनी सांगितले. स्वागत पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी तर आभार उपनिरीक्षक पुष्पा निमसे यांनी मानले. याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक शिवाजी अहिरे, हरेश्वर घुगे, मिथुन म्हात्रे, विजय पवार, रुपाली देवरे, धनवंता राऊत आदींसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.महिला पोलिसांशी संवादसिंधूताई सपकाळ यांनी कार्यक्रमानंतर पोलिसांशी संवाद साधला. तसेच महिला पोलिसांच्या कामकाजाविषयी माहिती जाणून घेताना पोलीस ठाण्यात कार्यरत अधिकारी, कर्मचारी व विशेष करून महिला पोलीस कर्मचाºयांवरील कामाचा ताणतणाव दूर करून त्यांच्यात आत्मविश्वास वाढविला.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय