शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक हवाईमार्गे सात शहरांना जोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 01:22 IST

नाशिक : अनेक वर्षांपासून विमान-सेवेसाठी प्रतीक्षा करणाºया नाशिककरांसाठी केंद्र सरकारची उडान योजना भरून पावली आहे. मुंबई आणि पुण्यापाठोपाठ आता आणखी सहा ठिकाणी नाशिकहून विमानसेवा सुरू होणार आहे. त्यानुसार दिल्ली आणि गोव्यासह सहा ठिकाणी नाशिक जोडले जाणार आहे. त्यासाठी विविध चार कंपन्यांनी बीड केले असून, लवकरच ही सेवा सुरू होणार आहे.केंद्र ...

नाशिक : अनेक वर्षांपासून विमान-सेवेसाठी प्रतीक्षा करणाºया नाशिककरांसाठी केंद्र सरकारची उडान योजना भरून पावली आहे. मुंबई आणि पुण्यापाठोपाठ आता आणखी सहा ठिकाणी नाशिकहून विमानसेवा सुरू होणार आहे. त्यानुसार दिल्ली आणि गोव्यासह सहा ठिकाणी नाशिक जोडले जाणार आहे. त्यासाठी विविध चार कंपन्यांनी बीड केले असून, लवकरच ही सेवा सुरू होणार आहे.केंद्र सरकारच्या उडान योजनेचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होत असून, त्यासंदर्भात केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री अशोक गजपती राजू यांनी देशभरातील विविध सेवांचे टप्पे निश्चित केले आहेत. त्याअंतर्गत नाशिकमधून सहा मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. गेल्यावर्षी उडानचा पहिला टप्पा सुरू झाल्यानंतर नाशिककरांची प्रतीक्षा संपली आणि पॅसेंजर टर्मिनल बांधून बंद असलेल्या ओझर येथील विमानतळावरून विमानसेवेला मुहूर्त लागला. मुंबई विमानतळावरून स्लॉट मिळाल्याने जून- जुलैमध्ये रखडलेली ही सेवा अखेरीस २३ डिसेंबर रोजी सुरू झाली. नाशिकहून मुंबई आणि पुणे या दोन ठिकाणी ही सेवा सध्या सुरू असली तरी मुंबईपेक्षा पुण्याच्या सेवेला अधिक प्रतिसाद मिळत आहे. याच दरम्यान उडानच्या दुसºया टप्प्याची तयारी सुरू झाली होती. नाशिकमधून कोणत्या शहरांना जाण्यास आवडेल यासंदर्भातील अनेक सर्व्हे नाशिकच्याच उद्योजक आणि व्यावसायिकांच्या संस्थेच्या माध्यमातून सुरू होते. त्यानुसार ही सेवा सुरू होणार असून, नाशिककरांची इच्छा पूर्ण होणार आहे. केवळ प्रवासच नव्हे तर नाशिकमधील उद्योग व्यावसायाला बुस्ट मिळणार आहे.उडानच्या पहिल्या टप्प्यात नाशिकची सेवा रखडल्याने दुसºया टप्प्यात नाशिकचा केंद्र सरकारने समावेश केला नव्हता. मात्र ही सेवा सुरू झाल्याचे नागरी उड्डान मंत्रालयाच्या लक्षात आणून दिल्यानंतर ऐनवेळी नाशिकचा दुसरा टप्प्यात समावेश करण्यात आला. त्यामुळे आता नाशिकच्या विकासाला गती मिळणार आहे. - हेमंत गोडसे, खासदार किफायतशीर दरात प्रवासाची संधीनाशिकहून दिल्ली, गोवा, अहमदाबाद, बंगळुरू, भोपाळ, दिल्ली, हिडान (गाझियाबाद) तसेच हैदराबाद या सात ठिकाणी विमानसेवा निश्चित करण्यात आली आहे. या सेवेसाठी एअर इंडियाची एअर लाइन्स, स्पाईस जेट, इंडिगो, ट्रस्ट, जेट एअरवेज या पाच कंपन्यांनी स्वारस्य दाखवले आहे. त्यामुळे नजीकच्या काळात या सर्व मार्गांवर काही प्रमाणात किफायतशीर दरात प्रवासाची संधी मिळणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकAirportविमानतळ