नाशिक : पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीच्या निषेधार्थ शहर कॉँग्रेसने मंगळवारी शहरातून सायकल मोर्चा काढत दुचाकीची अंत्ययात्रा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेली. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून दरवाढ त्वरीत मागे घ्यावी अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.सकाळी कॉँग्रेस भवनापासून निघालेला मोर्चा महात्मा गांधी रोडने धुमाळ पॉर्इंट, मेनरोड, शिवाजीरोड, शालीमार मार्गे मध्यवर्ती बस स्थानक चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. मोर्चात सहभागी कार्यकर्त्यांनी हातात विविध घोषणा लिहीलेले फलक घेतले होते. त्यात ‘बढती महंगाई, घटती कमाई’, ‘मोदीजी के विदेश मे, पकोडे बेचो देश मे’, ‘कमाई कम, महंगाई जादा’ अशा लक्षवेधी घोषणांनी जनतेचे लक्ष वेधून घेतले. तसेच बहुतांशी मोर्चेकरी सायकल घेवून सहभागी झाले होते, त्याच बरोबर वैकुंठ धाम वाहनात दुचाकी ठेवून प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली होती. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलिसांनी मोर्चा अडविल्यानंतर छोटेखानी सभाही घेण्यात आली. यावेळी शिष्टमंडळाने जिल्हाधिकाºयांची भेट घेवून निवेदन सादर केले. त्यात म्हटले आहे की, देशात व राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप सरकारने इंधन, भाजीपाला, कडधान्य यांच्या किंमतीत प्रचंड महागाई सोसावी लागत आहे. गेल्या १९२ दिवसात पेट्रोलच्या दरात १८ रूपयांनी वाढ झाली असून, त्यामुळे जनतेच्या मनात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. आंतरराष्टÑीय बाजारात पेट्रोल-डिझेलचे भाव कमी असताना सरकार दररोज दर वाढवित असून, घरगुती गॅसचे दरही साडेसातशे रूपयांच्या वर गेले आहेत. जीवनावश्यक वस्तुंच्या भावातही वाढ झाल्याने सर्वसामान्यांना जगणे मुश्किल झाले आहे अशा परिस्थितीत सरकारने किंमती कमी करण्याचा त्वरीत निर्णय घ्यावा व जनतेला दिलासा द्यावा अन्यथा रास्तारोको, मोर्चा आंदोलने करण्यात येतील असा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनात माजीमंत्री डॉ. शोभा बच्छाव, शहराध्यक्ष शरद अहेर, शाहू खैरे, डॉ. हेमलता पाटील, अश्विनी बोरस्ते, वत्सला खैरे, राहूल दिवे, हनिफ बशीर, वसंत ठाकूर, आर.आर. पाटील, विमल पाटील, समीर कांबळे, आशा तडवी, स्वप्नील पाटील, रईस शेख, बबलु खैरे, मीरा साबळे, आशा भंदुरे, अरूण दोंदे, मुन्ना ठाकूर, अण्णा मोरे, वंदना पाटील, मिना गांगुर्डे, अरूणा अहेर, डॉ. सुचेता बच्छाव यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ कॉँग्रेसचा सायकल मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 18:51 IST
सकाळी कॉँग्रेस भवनापासून निघालेला मोर्चा महात्मा गांधी रोडने धुमाळ पॉर्इंट, मेनरोड, शिवाजीरोड, शालीमार मार्गे मध्यवर्ती बस स्थानक चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. मोर्चात सहभागी कार्यकर्त्यांनी हातात विविध घोषणा लिहीलेले फलक घेतले होते. त्यात ‘बढती महंगाई, घटती कमाई’,
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ कॉँग्रेसचा सायकल मोर्चा
ठळक मुद्देदुचाकीची अंत्ययात्रा : सरकार विरोधात आंदोलनाचा इशारा ‘मोदीजी के विदेश मे, पकोडे बेचो देश मे’, ‘कमाई कम, महंगाई जादा’