लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : देश पातळीवर पक्ष संघटनेची धुरा कोणाच्या हाती सोपवावी यावरून पदाधिकारी, कार्यकर्ते संभ्रमित असताना नाशिक जिल्ह्णात पक्ष संघटना बांधणीसाठी प्रदेशचे कार्यध्यक्ष तीन दिवसांच्या दौºयावर येत असून, अगोदरच मरगळ आलेल्या संघटनेला त्याचा कितपत उपयोग होईल या विषयी कार्यकत्यांना संशय आहे.जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी डॉ. तुषार शेवाळे यांची नियुक्ती करून दीड वर्षपेक्षा अधिक कालावधी उलटला असून, स्वत: शेवाळे हेच लोकसभा निवडणुकिसाठी इच्छुक असताना पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारल्याने तेच मुळी रागावलेल्या अवस्थेत होते. मात्र त्यानंतर विधानसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना उमेदवारी दिली, त्यात त्यांचा पराभव झाला. या साºया गोष्टीमुळे पक्ष संघटना खिळखिळी झाली. परिणामी दीड वर्षे लोटूनही अजून पक्षाची जिल्हा कार्यकारिणी घोषित होऊ शकली नाही. त्यामुळे आहे त्याच जुन्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बळावर पक्षाची वाटचाल सुरू आहे, त्यातून जिल्हा अध्यक्ष बदलण्याच्या हालचाली अधूनमधून सुरु आहेत. पक्ष सत्तेवर असूनही कामे होत नसल्याची नाराजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांत असताना आता त्यांना उभारी देण्यासाठी प्रदेश कार्याध्यक्ष मुझ्झफर हुसेन तीन दिवसांच्या दौºयावर येत आहेत. प्रत्येक तालुक्याच्या मुख्यलयी त्यासाठी तालुका पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्याच्या सुचना असल्या तरी, काही तालुक्यात फक्त पदाधिकारीच शिल्लक राहिले आहेत, कार्यकर्त्यांनी कधीच अन्य पक्षाचा रास्ता धरला आहे. अशा परिस्थितीत कार्याध्यक्ष हुसेन यांच्या दौºयाच्या फल निष्पत्ती विषयी शंका व्यक्त केली जात आहे.
कार्याध्यक्षांच्या दौऱ्याबाबत काँग्रेस कार्यकर्तेच साशक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 00:40 IST
नाशिक : देश पातळीवर पक्ष संघटनेची धुरा कोणाच्या हाती सोपवावी यावरून पदाधिकारी, कार्यकर्ते संभ्रमित असताना नाशिक जिल्ह्णात पक्ष संघटना बांधणीसाठी प्रदेशचे कार्यध्यक्ष तीन दिवसांच्या दौºयावर येत असून, अगोदरच मरगळ आलेल्या संघटनेला त्याचा कितपत उपयोग होईल या विषयी कार्यकत्यांना संशय आहे.
कार्याध्यक्षांच्या दौऱ्याबाबत काँग्रेस कार्यकर्तेच साशक
ठळक मुद्देपक्षात मरगळ : दीड वर्ष उलटूनही कार्यकारिणी नाही