शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कॉँग्रेस करणार जनतेकडून निवडणूक निधी गोळा

By श्याम बागुल | Updated: November 23, 2018 16:52 IST

सत्तेवरून दूर गेल्यानंतर पहिल्यांदाच कॉँग्रेस पक्षाच्या देणगीदारांची संख्या घटली असून, सन २०१७-१८ मध्ये पक्षाला फक्त २७ कोटी रूपये पक्ष निधी मिळालेला आहे. अशा परिस्थितीत लोकसभा निवडणुकीला शस्त्र, सामुग्रीसह सामोरे जाण्यासाठी पैशांची मोठी कमतरता भासणार असल्याने पक्षाध्यक्ष राहूल गांधी यांच्या संकल्पनेतून

ठळक मुद्देनिवडणूक तयारी : इच्छेनुरूप देणगी देण्याची मुभा

नाशिक : आगामी लोकसभा व महाराष्टÑातील विधानसभा निवडणुकीला पुर्ण ताकदीनिशी सामोरे जाण्यासाठी कॉँग्रेस पक्षाने जोरदार तयारी चालविली असून, पक्षाच्या जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून पक्षापासून दुरावलेल्या कार्यकर्त्यांना जोडण्याबरोबरच, पक्षचिंतकांकडून निधीही गोळा करण्यास सुरूवात झाली आहे. रोख व धनादेशाच्या स्वरूपात गोळा करण्यात येणारे पैसे पक्ष कार्यासाठी वापरण्यात येणार आहेत.सत्तेवरून दूर गेल्यानंतर पहिल्यांदाच कॉँग्रेस पक्षाच्या देणगीदारांची संख्या घटली असून, सन २०१७-१८ मध्ये पक्षाला फक्त २७ कोटी रूपये पक्ष निधी मिळालेला आहे. अशा परिस्थितीत लोकसभा निवडणुकीला शस्त्र, सामुग्रीसह सामोरे जाण्यासाठी पैशांची मोठी कमतरता भासणार असल्याने पक्षाध्यक्ष राहूल गांधी यांच्या संकल्पनेतून जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून देशपातळीवर लोकवर्गणीही गोळा करण्याची मुभा सर्वच प्रदेश कॉँग्रेस कमिट्यांना देण्यात आली आहे. महाराष्टÑात या अभियानाची सुरूवात प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या नांदेड जिल्ह्यातून सुरूवात करण्यात आली, त्यानंतर राज्यातील दुसरा जिल्हा म्हणून नाशिकची निवड झाली आहे. या अभियानादरम्यान, केंद्र व राज्यातील सरकारने जनहित विरोधी घेतलेल्या निर्णयाची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याबरोबरच कॉँग्रेस पक्षाच्या राजवटीत आजवर घेतलेल्या जनहित निर्णयाची माहिती पक्ष कार्यकर्ते घरोघरी जावून देणार आहेत. त्यासाठी प्रचार पत्रके प्रसिद्ध करण्यात आले आहे. प्रत्येक विधानसभा मतदार संघातील किमान एक लाख कुटूंबापर्यंत हे पत्रक पोहोचविण्याचे उद्दिष्ट जिल्हा कमिट्यांना देण्यात आले, मात्र हे पत्रक हाती ठेवतानाच जनतेकडून पक्ष निधीची स्वच्छेने पावती फाडण्याची विनंतीही केली जाणार आहे. त्यात पक्ष निधी म्हणून इच्छेनुरूप देणगी देण्याची व घेण्याची मुभा परस्परांना देण्यात आली आहे.नाशिक येथे गुरूवारी प्रदेशााध्यक्ष चव्हाण यांच्या उपस्थितीत या जनसंपर्क अभियानाची सुरूवात करण्यात येवून स्वत: चव्हाण यांनी टिळकवाडीतील भुपेंद्र शहा यांच्याघरी जावून पत्रकाचे वाटप तर केलेच परंतु त्यांच्याकडून अकरा हजार रूपयांची घसघशीत रक्कमही पक्षनिधी म्हणून जमा केले तर चव्हाण यांच्या पत्रकारपरिषदेच्या स्थळी सुधाकर मुळाणे यांनी पाच हजार रूपये पक्ष निधी म्हणून दिले. नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुमारे दहा लाख व नाशिक शहरात चार लाख अशा पंधरा लाख प्रचार पत्रकांच्या माध्यमातून जनतेपर्यंत कॉँग्रेस पोहोचणार आहे. पक्ष निधी किती गोळा करायचा याचे मात्र पक्षाने उद्दिष्ट दिलेले नाही.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक