शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महापौरपदाच्या खेळीत कॉँग्रेस यशस्वी

By admin | Updated: June 10, 2017 01:09 IST

आझादनगर : मालेगाव महानगर पालिका महापौर पदाच्या निवडणुकीत कॉँग्रेस- शिवसेनेची युती झाल्याने शेख रशीद यांच्या माध्यमातुन कॉँग्रेसचा महापौर होण्याची शक्यता आहे

 रशीद सय्यद । लोकमत न्यूज नेटवर्कआझादनगर : मालेगाव महानगर पालिका महापौर पदाच्या निवडणुकीत कॉँग्रेस- शिवसेनेची युती झाल्याने माजी आमदार शेख रशीद यांच्या माध्यमातुन कॉँग्रेसचा महापौर होण्याची शक्यता आहे. दरम्यान आज भाजपाचे सुनिल गायकवाड व राष्ट्रवादी कॉँग्रेस - जनता दल महायुतीचे गटनेता बुलंद एकबाल यांनी एकत्रीत येत महापौर व उपमहापौर पदाचे अर्ज दाखल केल्याने महाआघाडी व भाजपाची युती झाल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महापौर पदाची माळ कुणाच्या गळ्यात टाकावयाची हे अवघ्या सात सदस्यीय एमआयएमवर अवलंबून आहे.मालेगाव महानगर पालिका निवडणुकीत कुणालाही स्पष्ट बहुमत न मिळाल्याने त्रिशंकु अवस्था झाली आहे. जादुई आकडा गाठणे हा सर्वच पक्षाच्या नेत्यांना नाकीनऊ करण्यासाठी पुरेसा होता. कॉँग्रेस २८ तर राकॉँ-जद महाआघाडीचे २७ सदस्य निवडून आले होते. कॉँग्रेस- राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये समेट घडवून आणण्यासाठी वरिष्ठ पातळीवरुन झालेल्या प्रयत्नांना अपयश आले. मोठ्या पक्षांकडे सेना-भाजपा किंवा एमआयएमचे समर्थन घेण्याशिवाय पर्याय नव्हता व त्या दिशेने कॉँग्रेस- राष्ट्रवादी कॉँग्रेस आपापल्या परीने सेनेचे राज्यमंत्री दादा भुसे यांच्या संपर्कात होते. वास्तविक प्रथम सेनेचा झुकते पारडे हा मुफ्तींकडेच होते. मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी निवडणुकीत अवघ्या दोन दिवसापूर्वी सेनेच्या दोन नगरसेवकांसाठी प्रचारही केला होता. त्यामुळे निकालापूर्वी राकॉँ व सेनेची युती झाल्याचे जगजाहीर झाले होते.माजी आमदार शेख रशीद यांनी निवडणुकीपूर्वीच स्वत:ला महापौर पदासाठी आपले नाव घोषित केले असल्याने विद्यमान आमदार आसिफ शेख व स्वत: रशीद शेख यांच्यासाठी महापौर पदाची निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. सर्वांशी सलोख्याचे संबंध असलेले शेख रशीद यांनी नेहमी प्रमाणे आपले राजकीय डावपेच यशस्वी करीत शिवसेनेला आपल्याकडे खेचण्यास यश मिळविले. राष्ट्रवादी कॉँग्रेसकडूनही शिवसेनेला उपमहापौर पदाची ‘आॅफर’ होती. त्यामुळे सेना कॉँग्रेसकडे कशी आकृष्ट झाली याबाबत नागरिकात चर्चा सुरू आहे. परिणामी राकॉँचे सर्वेसर्वा मुफ्ती मोहंमद इस्माईल हे डावपेच आखण्यात मागे पडले असून आता या नाट्यात एमआयएमची भूमिका महत्वाची ठरणार आहे. एमआयएमने सेना ज्यांच्या बाजुने राहील त्यास आम्ही (उघड वा बाहेरुन) पाठींबा देवू अशी पहिल्या दिवसापासूनच सावध भुमिका घेतली आहे.