या दौऱ्याच्या निमित्ताने जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. येत्या शनिवारी (दि.२६) प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आमदार नाना पटोले हे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून दौऱ्याची सुरूवात मालेगाव येथून होणार आहे. त्यांच्या उपस्थितीत चांदवड, पिंपळगाव बसवंत, तसेच नाशिक येथील तुपसाखरे लॉन्स येथे शेतकरी संवाद मेळावा व तालुका अध्यक्ष यांच्याशी चर्चा केली जाणार आहेत. आगामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले असून, हा दौरा यशस्वी करण्यासाठी सर्वच नेत्यांनी प्रयत्न करावे अशी सूचना डॉ. शेवाळे यांनी यावेळी केली. यावेळी आमदार हिरामण खोसकर, राजाराम पानगव्हाणे, माजी मंत्री शोभा बच्छाव, शरद आहेर, शिरीष कोतवाल, अनिल आहेर, निर्मला खर्डे आदींनी मार्गदर्शन केले. बैठकीस रमेश कहांडोळे, संपत सकाळे, दिगंबर गिते, संदीप गुळवे, ज्ञानेश्वर काळे, शैलेश पवार, सुमित्रा बहिरम, दिनेश चौथवे, संपत वक्ते, रौफ कोकणी, यशवंत पाटील, शांताराम राठोड, रमेश पवार आदी उपस्थित होते. या बैठकीत कळवण तालुका कार्यध्यक्षपदी केला सोनवणे, तर कळवण शहर अध्यक्षपदी सागर जगताप यांची नियुक्ती करण्यात आली. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर गायकवाड यांनी तर आभार प्रकाश अडसरे यांनी मानले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले शनिवारी जिल्हा दौऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:11 IST