शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
5
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
6
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
7
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
8
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
9
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
10
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
11
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
12
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
13
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
15
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
16
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
17
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
18
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
19
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
20
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू

स्थायी प्रकरणी नगरसेवक गांगुर्डे यांना कॉँग्रेसची नोटीस?

By admin | Updated: June 7, 2014 01:49 IST

नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीत सदस्यपदाच्या वादावरून कॉँग्रेसमध्ये जुंपली

नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीत सदस्यपदाच्या वादावरून कॉँग्रेसमध्ये जुंपली असून, समितीचे विद्यमान सदस्य शिवाजी गांगुर्डे यांनी राजीनामा द्यावा, यासाठी सूचना करण्यात आली. मात्र त्यानंतरही गांगुर्डे यांनी राजीनामा न दिल्याने पक्षाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे वृत्त आहे. अर्थात, गांगुर्डे यांनी त्याचा इन्कार केला आहे.स्थायी समितीच्या सदस्यांची पक्षीय तौलनिक बळानुसार नियुक्ती होते. त्यामुळे कॉँग्रेस पक्षाचे शिवाजी गांगुर्डे यांनी समिती सदस्यपदाचा राजीनामा दिल्यास त्यांच्या जागी कॉँग्रेस नगरसेवकाचीच नियुक्ती होऊ शकेल. गांगुर्डे यांची स्थायी समितीतील नियुक्ती दोन वर्षांकरिता आहे, परंतु मनसे आणि राष्ट्रवादीप्रमाणेच कॉँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांचा राजीनामा घेऊन अन्य नगरसेवकाला संधी देण्याचा प्रयत्न करीत आहेत. यासंदर्भात गटनेते लक्ष्मण जायभावे यांनी गांगुर्डे यांना सूचित केले, परंतु त्यांनी राजीनामा दिला नाही. त्यामुळे पक्षाचे प्रभारी भाई जगताप यांनी त्यांना नोटीस बजावल्याचे वृत्त आहे. अर्थात गांगुर्डे यांनी त्याचा इन्कार केला आहे. महापालिका प्रांतिक अधिनियमानुसार स्थायी समितीत कोणत्याही सदस्याची नियुक्ती दोन वर्षांकरिता असते. परंतु गांगुर्डे यांची नियुक्ती होऊन एक वर्ष झाले आहे. त्यामुळे मुळातच दोन वर्षे नियुक्ती असलेल्या सदस्याला त्याचा कार्यकाळ अपूर्ण असताना राजीनामा मागणे हे कायद्याला धरून नाही, असे गांगुर्डे यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात त्यांनी पक्षाला लेखी पत्र पाठविल्याचे वृत्त आहे. आपल्याला कोणतीही नोटीस मिळाली नाही, केवळ तोंडी सूचना करण्यात आली होती, असेही त्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)