महेश गुजराथी : चांदवडगेल्या २० वर्षांपासून चांदवड पंचायत समितीत कॉँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता आता संपुष्टात आली. आज तरी चांदवड तालुक्यात स्पष्ट बहुमत कोणत्याही पक्षाला मिळाले नसले तरी अखेर भाजपा व शिवसेनेत विळ्या भोपळ्याचे झालेले नाते हे शेवटी सत्तास्थापनेसाठी एकत्र होतील यात शंकाच नाही. तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजपा व शिवसेनेत यापूर्वीच युती न झाल्याने दोन्ही पक्षांनी वेगवेगळ्या निवडणुका लढविल्या आहेत तर चांदवड तालुक्यात कॉँग्रेस व राष्ट्रवादीत मात्र आघाडी झाल्याने त्यांनी दोन-दोन गट व चार-चार गण वाटुन घेतले. मात्र त्याचाही फारसा फायदा झाला नाही.चांदवड तालुक्यात जिल्हा परिषदेच्या चार गटात भाजपा, राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना प्रत्येकी एक एक जागा तर आठ गणात भाजपा ३ , शिवसेना २, राष्ट्रवादी २, काँग्रेस १ असे संख्या बळ प्राप्त झाले त्यामुळे त्रिशंकू अवस्था असली तरी भाजपा - शिवसेना एकत्र आली तर सत्ता स्थापू शकतात मात्र हे येणारा काळच ठरवेन. तालुक्यात नव्हे तर सर्वत्र नोटबंदी, शेतमालाचे भाव, शेतमालाचे पैसे चेकने वेळेवर न मिळणे हे मुद्दे भाजपाला मतदान करणार नाही हे शेवटी निवडणूक निकालावरून फोल ठरले. त्यामुळे अनेक राजकीय विश्लेषकांचे अंदाज चुकले आहेत. आज तरी चांदवड तालुक्यात भाजपा व शिवसेनेला सत्ता स्थापू शकतील एवढे बहुमत आहे. मात्र निवडणुकीच्या तोंडावर भाजपा व शिवसेनेत झालेले तोंडसुख आता पंचायत समिती सत्ता स्थापन करतांना किती टिकते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दुगाव गटात राष्ट्रवादी कॉँग्रेसची सत्ता बऱ्याच दिवसापासून असल्याने ती या गटाने व गणाने कायमस्वरुपी आपल्याच हाती ठेवली येथे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनील रामकृष्ण शेलार, शिवसेनेचे प्रा. राजेंद्र सोमवंशी, रिपब्लीकनचे राजेंद्र लक्ष्मण गांगुर्डे असा चौरंगी सामनाझाला व राष्ट्रवादीचे डॉ. सयाजीराव गायकवाड मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. या गटात भाजपाचे सुनील शेलार कायमस्वरुपी रहिवासी असतांना त्यांना मतदारांनी टाळले तर नाशिक निवासी असणारे मात्र नेहमीच संपर्कात असल्याने त्यांना मतदारांनी तारले आहे. ते यापुर्वी याच गटातुन निवडून आले होते. तर दुगाव गणात कॉँग्रेसच्या निर्मला अहेर व मेसनखेडे गणात राष्ट्रवादीचे शिवाजी सोनवणे विजयी झाले. वडाळीभोई गट हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून आजही तो शिवसेनेने राखला येथे कष्टकरी व मजुरी करणाऱ्या शिवसेनेच्या कविता भाऊसाहेब धाकराव यांनी जोरदार राष्ट्रवादीच्या ज्योती बाळासाहेब धाकराव यांना पाठले तर वडाळीभोई गणात राष्ट्रवादीची सत्ता मोडीत काढीत शिवसेनेने आघाडी घेतली येथे शिवसेनेचे तालुकाप्रमुख नितीन अहेर यांनी कादवाचे संचालक व सोसायटीचे सभापती सुखदेव जाधव यांचा पराभव केला जनसंपर्क , शिवसेनेतील कामाची पावती म्हणून त्यांचा विजय झाला आहे. सुखदेव जाधव हे सभापती अनिता जाधव यांचे पती आहे. मात्र येथेही जोरदार चुरस झाली व वडाळीभोई येथील राष्ट्रवादीची सत्ता गमवावी लागली.एक गठ्ठा मतांची विभागणीतालुक्यातील प्रतिष्ठेचा समजला जाणारा तळेगावरोही गटात अखेर कॉँग्रेस व राष्ट्र्रवादीची युती झाली तरी येथे बंडखोरी झाली. येथून राष्ट्रवादीचे प्रा.मधुकर टोपे यांना तिकीट न मिळाल्याने बंडखोरी केली होती तर भाजपातूनही ज्यांना तिकिटाची खात्री होती ते डॉ. राजेंद्र दवंडे यांनी अखेर बंडखोरी केली. त्यामुळे गटातील गठ्ठा मते या बंडखोरांनी घेतलीच नाही मात्र येथे माजी आमदार शिरीष कोतवाल यांचे सुपुत्र राहुल शिरीषकुमार कोतवाल हे कॉँग्रेसकडून उभे होते तर त्यांच्या विरोधात डॉ. आत्माराम कुंभार्डे भाजपाकडून निवडणूक लढविली.
काँग्रेस, राष्ट्रवादी बॅकफूटवर
By admin | Updated: February 24, 2017 23:52 IST