शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

बाळासाहेब थोरात यांनी एकनाथ शिंदेंचं केलं कौतुक; एक डायलॉगही मारला अन् एकच हशा पिकला!

By मुकेश चव्हाण | Updated: March 18, 2023 19:08 IST

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मारकाचे व पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण आज करण्यात आले.

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मारकाचे व पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण आज करण्यात आले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपाच्या खासदार प्रितम मुंडे, भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे, काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांच्यासह विविध नेते उपस्थित होते. 

लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेजी यांनी अठरापगड जातीसाठी काम केले असून आपल्या कामामुळे ते लोकनेते या बिरूदाचे मुकुटमणी होते, असं एकनाथ शिंदे म्हणाले. राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांचे, सर्वसामान्यांचे आणि गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांवर चालणारे असल्याचे सांगताना शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, अवकाळी पाऊसाने झालेल्या नुकसानीची भरपाई शासन नक्की देईल, असं आश्वासन देखील एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले. 

बाळासाहेब थोरात यांनी देखील या कार्यक्रमात भाषण केले. यावेळी त्यांनी नितीन गडकरी यांच्यासह एकनाथ शिंदे यांचं बाळासाहेब थोरात यांनी तोंडभरुन कौतुक केलं. नितीन गडकरींची प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकप्रियता आहे, ही कोणीही नाकारु शकत नाही. कुठेही जा...रिक्षा चालवणाऱ्याला विचारा किंवा रस्त्यावरील हमाल करणाऱ्याला विचारा...देशातील लोकप्रिय मंत्री कोण?, असा प्रश्न विचारल्यास नितीन गडकरी यांचं नाव घेतलं आहे, असं बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले. 

बाळासाहेब थोरात यांनी एकनाथ शिंदे यांचंही कौतुक केलं. एकनाथ शिंदेसाहेब आपण मुख्यमंत्री आहात, तुम्हाला संधी मिळाली आहे. काम करताय, मात्र आमची संधी घालवली हेदेखील खरंय, असं बाळासाहेब थोरात म्हणताच एकनाथ शिंदेंसह सर्वांना हसू आले. पण तुम्ही खूप मेहनती आहात, हे विसरुन जाता येत नाही. जो काही वेळ मिळतोय, जी संधी मिळेल, जास्तीत जास्त लोकांचं काम करण्याचा प्रयत्न तुम्ही करताय, हे आम्ही देखील पाहतोय, असं कौतुक बाळासाहेब थोरात यांनी एकनाथ शिंदेंचं यावेळी केलं. 

एकनाथ शिंदेंची घोषणा अन् पंकजा मुंडेंनीही वाजवल्या टाळ्या

ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी वसतिगृहाची मागणी पंकजा मुंडेंनी केलीय. अनेक शहरांची नावे त्यांनी घेतली. मी याठिकाणी शब्द देतो की, या ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या वसतिगृहासाठीचे काम युद्धपातळीवर सुरू होईल, असे म्हणद मुख्यमंत्री शिंदे यांनी आश्वासन दिले. त्यावेळी, पंकजा मुंडेंनी दोन्ही हातांनी टाळ्या वाजवत या घोषणेवर आनंद व्यक्त केला. तसेच, पंकजाताई म्हणाल्या की, गोपीनाथ मुंडे यांचं स्मारक नका उभारू, पण हॉस्पीटल उभारा तर मी आत्ताच सांगतो, मुंडे साहेबांचं स्मारकसुद्ध होईल आणि हॉस्पीटलसुद्धा होईल, अशी घोषणाच मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेGopinath Mundeगोपीनाथ मुंडेBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार