शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकची जागा मागून कॉँग्रेसकडून भुजबळांची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 01:35 IST

लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून राष्टवादीकडून छगन भुजबळ उमेदवारी करणार नसतील तर ही जागा कॉँग्रेसला सोडण्यात यावी, अशी आग्रही मागणी करून कॉँग्रेसकडून लोकसभेची उमेदवारी करण्यासाठी अनेकांनी इच्छा प्रदर्शित केल्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्टवादी व पर्यायाने छगन भुजबळ यांची राजकीय कोंडी झाल्याचे मानले जात आहे.

नाशिक : लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून राष्टवादीकडून छगन भुजबळ उमेदवारी करणार नसतील तर ही जागा कॉँग्रेसला सोडण्यात यावी, अशी आग्रही मागणी करून कॉँग्रेसकडून लोकसभेची उमेदवारी करण्यासाठी अनेकांनी इच्छा प्रदर्शित केल्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्टवादी व पर्यायाने छगन भुजबळ यांची राजकीय कोंडी झाल्याचे मानले जात आहे.  भुजबळ हे लोकसभेत जाणार की विधानसभेत यावर अद्यापनिर्णय झालेला नसला तरी, नाशिकच्या जागेवर भुजबळ कुटुंबीयातील कोणीतरी उमेदवारी करणार असल्याने त्यादृष्टीने तयारी केली जात आहे.  अशा परिस्थितीत कॉँग्रेसच्या जागा मागणीमुळे नवीन राजकीय पेच निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  नाशिक लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादीच्या वाट्याला असून, माधवराव पाटील, देवीदास पिंगळे, समीर भुजबळ यांनी या मतदारसंघातून विजयश्री प्राप्त केली असून, २०१४ च्या निवडणुकीत मात्र छगन भुजबळ यांच्यासारख्या राज्यस्तरीय मातब्बर नेत्याला पराभवाची धूळ चाखावी लागली होती.  असला तरी, गेल्या काही महिन्यांपासून स्वत: छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ हे दोन्हीही लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारीला लागले आहेत. सामाजिक, राजकीय प्रश्नांची तड लावण्याबरोबरच अगदी पक्ष संघटनेच्या कामातही दोघांनी झोकून घेतल्यामुळे त्याचा संबंध निवडणूक तयारीशी जोडला जात आहे. कॉँग्रेसला ही सारी परिस्थिती ज्ञात असतानाही त्यांनी मुंबईत पक्ष श्रेष्ठींकडे नाशिकच्या जागेवर हक्क सांगून उमेदवारीसाठी तयारीही दर्शविल्यामुळे राष्टÑवादी व खुद्द भुजबळ परिवार पेचात पडला आहे. विशेष म्हणजे राष्टÑवादीकडून स्वत: छगन भुजबळ उमेदवारी करणार असतील तर जागा नको, अशी भूमिकाही कॉँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाने घेतल्यामुळे भुजबळ यांच्या व्यतिरिक्त अन्य उमेदवाराला कॉँग्रेसची पसंती नाही, असा त्यातून अर्थ काढला जात आहे. मध्यंतरी भुजबळ यांनी लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. त्यामुळेच कदाचित कॉँग्रेसने नाशिकच्या जागेवर दावा ठोकून भुजबळ यांची राजकीय कोंडी केल्याचा अर्थ काढला जात आहे.युतीचे पाच आमदारसद्यस्थितीत या मतदारसंघांतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघात राष्टÑवादीचा एकही आमदार नाही. उलट मित्रपक्ष भाजपा-सेनेचे या मतदारसंघावर वर्चस्व असून, भाजपाचे तीन, तर सेनेचे दोन आमदार कार्यरत आहेत, एका मतदारसंघात कॉँग्रेसचे आमदार आहेत. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवेन का असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकcongressकाँग्रेसChagan Bhujbalछगन भुजबळNCPराष्ट्रवादी काँग्रेस