शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गाव तेथे शाखा उघडण्याचा कॉँग्रेसचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 19:59 IST

केंद्र सरकार हे सातत्याने भाजप व आरएसएस या संघटनेचा झेंडा राबवत असून, सातत्याने संविधान विरोधी भूमिका घेत आहे याचाच एक भाग म्हणून एका मोठ्या राज्याच्या न्यायालय निकालाच्या आधारावर

ठळक मुद्देबैठकीत निर्णय : सरकारच्या आरक्षण विरोधी धोरणावर टीकाधरणे आंदोलन करण्याचे ठरविण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कॉँग्रेसच्या जिल्हा, शहर पदाधिकाऱ्यांची बैठक होऊन या बैठकीत पक्ष संघटना बळकट करण्यासाठी आगामी काळात गाव तेथे शाखा उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या संविधान विरोधी भूमिकेवर टीका करून आरक्षणाला धक्का लावण्याच्या सरकारच्या प्रयत्नाला विरोध करण्याचे ठरविण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे होते.

केंद्र सरकार हे सातत्याने भाजप व आरएसएस या संघटनेचा झेंडा राबवत असून, सातत्याने संविधान विरोधी भूमिका घेत आहे याचाच एक भाग म्हणून एका मोठ्या राज्याच्या न्यायालय निकालाच्या आधारावर केंद्र सरकार मागासवर्गीय, आदिवासी, ओबीसी समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी प्रयत्न करत असून, त्याला काँग्रेस पक्ष प्रचंड प्रमाणात विरोध करत आहे. केवळ विरोधच नाही तर त्याविरोधात देशभर आंदोलन उभे करेल, असा इशारा जिल्हा अध्यक्ष शेवाळे यांनी दिला. त्याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारचा आरक्षण विरोधी धोरणाचा विरोध करत पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन करण्याचे ठरविण्यात आले. पक्ष सत्तेत सहभागी झाल्याने त्याचा फायदा उठवित शहर व जिल्ह्यातील पक्षाच्या सर्व आघाड्यांना बळ देऊन त्यांचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी नजीकच्या काळात गाव तिथे शाखा यादृष्टीने प्रत्येक गावात शाखा उघडण्याबाबत निर्णय घेण्यात आला. यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष शरद आहेर, आमदार हिरामण खोसकर, डॉ. हेमलता पाटील, शाहू खैरे, विजय राऊत, दिगंबर गिते, राजेंद्र बागुल, निर्मलाताई खर्डे, रमेश कहांडोळे, सुरेश मारू आदींनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी वत्सला खैरे, यशवंत पाटील, नंदकुमार कर्डक, मोहन करंजकर, समिना पठाण, लक्ष्मण धोत्रे, समीर देशमुख, विनायक सांगळे, भरत टाकेकर, वसंत ठाकूर, संजय जाधव, बबलू खैरे, उद्धव पवार, रामचंद्र चौधरी, कैलास कडलग, दिनेश निकाळे, अशोक टोंगारे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक रतन जाधव यांनी तर सूत्रसंचालन ज्ञानेश्वर काळे यांनी केले.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक