शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कॉँग्रेस करणार निवडणूक निधी गोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 00:35 IST

आगामी लोकसभा व महाराष्टÑातील विधानसभा निवडणुकीला पूर्ण ताकदीनिशी सामोरे जाण्यासाठी कॉँग्रेस पक्षाने जोरदार तयारी चालविली असून, पक्षाच्या जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून पक्षापासून दुरावलेल्या कार्यकर्त्यांना जोडण्याबरोबरच, पक्षचिंतकांकडून निधीही गोळा करण्यास सुरुवात झाली आहे. रोख व धनादेशाच्या स्वरूपात गोळा करण्यात येणारे पैसे पक्ष कार्यासाठी वापरण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देनिवडणूक तयारी : इच्छेनुरूप देणगी देण्याची मुभा

नाशिक : आगामी लोकसभा व महाराष्टÑातील विधानसभा निवडणुकीला पूर्ण ताकदीनिशी सामोरे जाण्यासाठी कॉँग्रेस पक्षाने जोरदार तयारी चालविली असून, पक्षाच्या जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून पक्षापासून दुरावलेल्या कार्यकर्त्यांना जोडण्याबरोबरच, पक्षचिंतकांकडून निधीही गोळा करण्यास सुरुवात झाली आहे. रोख व धनादेशाच्या स्वरूपात गोळा करण्यात येणारे पैसे पक्ष कार्यासाठी वापरण्यात येणार आहेत.सत्तेवरून दूर गेल्यानंतर पहिल्यांदाच कॉँग्रेस पक्षाच्या देणगीदारांची संख्या घटली असून, सन २०१७-१८ मध्ये पक्षाला फक्त २७ कोटी रुपये पक्ष निधी मिळालेला आहे. अशा परिस्थितीत लोकसभा निवडणुकीला शस्त्र, सामुग्रीसह सामोरे जाण्यासाठी पैशांची मोठी कमतरता भासणार असल्याने पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या संकल्पनेतून जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून देशपातळीवर लोकवर्गणीही गोळा करण्याची मुभा सर्वच प्रदेश कॉँग्रेस कमिट्यांना देण्यात आली आहे. महाराष्टÑात या अभियानाची सुरुवात प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या नांदेड जिल्ह्यातून सुरूवात करण्यात आली, त्यानंतर राज्यातील दुसरा जिल्हा म्हणून नाशिकची निवड झाली आहे.या अभियानादरम्यान, केंद्र व राज्यातील सरकारने जनहित विरोधी घेतलेल्या निर्णयाची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याबरोबरच कॉँग्रेस पक्षाच्या राजवटीत आजवर घेतलेल्या जनहित निर्णयाची माहिती पक्ष कार्यकर्ते घरोघरी जाऊन देणार आहेत. त्यासाठी प्रचारपत्रके प्रसिद्ध करण्यात आले आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील किमान एक लाख कुटुंबापर्यंत हे पत्रक पोहोचविण्याचे उद्दिष्ट जिल्हा कमिट्यांना देण्यात आले, मात्र हे पत्रक हाती ठेवतानाच जनतेकडून पक्ष निधीची स्वच्छेने पावती फाडण्याची विनंतीही केली जाणार आहे. त्यात पक्ष निधी म्हणून इच्छेनुरूप देणगी देण्याची व घेण्याची मुभा परस्परांना देण्यात आली आहे.नाशिक येथे गुरुवारी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या उपस्थितीत या जनसंपर्क अभियानाची सुरुवात करण्यात येऊन स्वत: चव्हाण यांनी टिळकवाडीतील भुपेंद्र शहा यांच्या घरी जाऊन पत्रकाचे वाटप तर केलेच, परंतु त्यांच्याकडून ११ हजार रुपयांची घसघशीत रक्कमही पक्षनिधी म्हणून जमा केले तर चव्हाण यांच्या पत्रकार परिषदेच्या स्थळी सुधाकर मुळाणे यांनी पाच हजार रुपये पक्ष निधी म्हणून दिले. नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुमारे दहा लाख व नाशिक शहरात चार लाख अशा पंधरा लाख प्रचार पत्रकांच्या माध्यमातून जनतेपर्यंत कॉँग्रेस पोहोचणार आहे. पक्ष निधी किती गोळा करायचा याचे मात्र पक्षाने उद्दिष्ट दिलेले नाही.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेस