शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कळवणला कॉँग्रेस, भाजपा आमने-सामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 01:09 IST

येथील नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून माजी आमदार अ‍ॅड काशिनाथ बहीरम यांचे सुपूत्र मयुर बहीरम व भाजपकडून नगरसेविका सौ सुरेखा जगताप या दोघांमध्ये लढत होत असून काँग्रेसच्या रोहीणी महाले यांनी मंगळवारी नामनिर्देशनपत्र मागे घेतल्याने नगराध्यक्षपदासाठी काँग्रेस व भाजप यांच्यात आमने सामने दुरंगी लढत होत आहे.

कळवण : येथील नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून माजी आमदार अ‍ॅड काशिनाथ बहीरम यांचे सुपूत्र मयुर बहीरम व भाजपकडून नगरसेविका सौ सुरेखा जगताप या दोघांमध्ये लढत होत असून काँग्रेसच्या रोहीणी महाले यांनी मंगळवारी नामनिर्देशनपत्र मागे घेतल्याने नगराध्यक्षपदासाठी काँग्रेस व भाजप यांच्यात आमने सामने दुरंगी लढत होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने काँग्रेसच्या मयुर बहीरम यांच्या नावाला हिरवा कंदील दिला असून भाजपकडे बहुमत नसतांनौ सुरेखा जगताप या नगराध्यक्ष निवडणुकीला सामोरे जात असल्याने चमत्कार होतो की काय याकडे कळवणकरांचे लक्ष लागले आहे.  कळवण नगरपंचायतच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ बुधवारी (दि.३०) संपत आहे. या पाशर््वभूमीवर नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदासाठी निवडणुक कार्यक्र म जिल्हाधिकारी कार्यालयाने घोषित केला आहे.  नगरपंचायत सभागृहात नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदासाठी निवडणुक होणार आहे. उपनगराध्यक्षपदाचे नामनिर्देशनपत्र बुधवारी स्वीकारले जाऊन त्यानंतर निवडणुक प्रक्रि या पूर्ण केली जाणार आहे. नगराध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जमातीसाठी राखीव निघाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडे बहुमत आहे. मात्र अनुसूचित जमातीचा सदस्य नसल्याने नगराध्यक्षपदावर पाणी सोडावे लागले. काँग्रेस व भाजपला संधी चालून आली असल्याने दोघांनी नगराध्यक्षपदासाठी नामनिर्देशनपत्र दाखल केल्यामुळे नगराध्यक्षपदासाठी निवडणुक होणार असल्याने संधी कुणाला मिळणार याकडे लक्ष लागले आहे.  १७ सदस्य असलेल्या कळवण नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस , कॉग्रेस , भाजप व शिवसेना अशी आघाडी असून आघाडीचे १४ सदस्य तर भाजपचे ३ सदस्य आहेत. कळवण नगरपंचायतच्या प्रथम नगराध्यक्षपदाचा मान राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनिता पगार यांना मिळाला होता. द्वितीय नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार व गटनेते कौतिक पगार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा कौल काँग्रेसचे नगरसेवक मयुर बहीरम यांच्या बाजूने दिला असल्याने कॉग्रेसच्या मयुर बहीरम यांच्या नगराध्यक्षपदावर आज शिक्कामोर्तब होईल मात्र नगरपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा झेंडा रहाणार आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडीच्या निमित्ताने तालुक्यातील राजकीय समीकरणामध्ये बदल होणार असल्याचे संकेत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे यांनी दिले असून कळवण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडीचा धर्म पाळून काँग्रेसला संधी दिल्याचे हिरे यांनी सांगितले.

टॅग्स :Electionनिवडणूक