शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

समको बॅँकेच्या वार्षिक सभेत गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 16:04 IST

हमरीतुमरी : सभासदांनी घेतला व्यासपीठाचा ताबा

ठळक मुद्देजेष्ठ सभासदांनी धुडगूस घालणाऱ्या सभासदांना शांततेचे आवाहन केल्यानंतर सभा पुर्ववत सुरु झाली

सटाणा : येथील सटाणा मर्चंट्स को-आॅप बँकेच्या ६३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सत्ताधारी संचालकांविरूद्ध सभासदांनी आक्र मक भूमिका घेतल्याने गोंधळातच सभा पार पडली.अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र अलई होते. मागील वर्षीच्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्ताचे वाचन सुरु असतांना गोंधळ सुरु झाला. ध्वनिक्षेपकाची ओढाताण करीत एकावेळेस तीन ते चार सभासद ध्वनिक्षेपकावर बोलू लागले. काही सभासदांनी तर शिवराळ भाषेत संचालक मंडळाविरुद्ध आरोप सुरू केले. या गोंधळातच काही सभासदांनी व्यासपीठाचा ताबा घेतला. व्यासपीठावर बसलेल्या काही संचालकांना धक्काबुक्कीही झाली. त्यामुळे महिला संचालक भेदरल्या अवस्थेत व्यासपीठाखाली उतरल्या. अखेर काही जेष्ठ सभासदांनी धुडगूस घालणाऱ्या सभासदांना शांततेचे आवाहन केल्यानंतर सभा पुर्ववत सुरु झाली.ज्या सभासदांनी ‘केवायसी’ पूर्तता केलेली नाही त्यांनी ६० दिवसांच्या आत पुर्तता करावी असे निर्देश संचालक मंडळाच्या वतीने जेष्ठ संचालक रमेश देवरे यांनी दिले. यावेळी झालेल्या चर्चेत जेष्ठ सभासद आण्णासाहेब सोनवणे, पंडितराव सोनवणे, बिंदू शर्मा, मनोहर देवरे, अरविंद सोनवणे, बाळासाहेब बिरारी, संजय सोनवणे, रत्नाकर सोनवणे, बाळू भांगिडया, जिभाऊ सोनवणे आदींनी भाग घेतला.अध्यक्ष राजेंद्र अलई, संचालक यशवंत अमृतकर,रु पाली कोठावदे, कैलास येवला यांनी सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. व्यासपीठावर उपाध्यक्ष कल्पना येवला, संचालक पंकज ततार, प्रवीण येवला, शरद सोनवणे, किशोर गहिवड, जयवंत येवला, दिलीप येवला, अशोक निकम, दिलीप चव्हाण, प्रकाश सोनग्रा, जगदीश मुंडावरे, विठ्ठल येवलकर उपस्थित होते. बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशा येवला यांनी प्रास्ताविक केले. भरत पवार यांनी इतिवृताचे वाचन केले.हिशेब तपासणीसच्या पुर्ननियुक्तीला विरोधसभेत २०१७-१८ या वर्षातील ताळेबंद, नफा तोटा पत्रक, अहवाल सालातील नफा वाटणी,सभासदांना भेट वस्तूंचे वाटप करणे या ठरावास सभासदांनी मंजुरी दिली. अहवाल काळात ज्या हिशोब तपासणीची संचालक मंडळास पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला त्याची पुन्हा नेमणूक करू नये असा ठराव करण्यात आला.

टॅग्स :Nashikनाशिकbankबँक