शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

हिंदुत्ववादी संघटनांचा आयुक्तालयात गोंधळ

By admin | Updated: December 9, 2015 23:07 IST

नोंदणी विवाहाचे निमित्त : युवतीला पळवून नेणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

नाशिक : नोंदणी पद्धतीने विवाहाची नोटीस दिलेल्या तरुणाने मित्रांसह युवतीच्या घरी जाऊन तिची आई व भावास मारहाण करून युवतीस पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी व युवतीला पळवून नेणाऱ्यांची चौकशी करावी, या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांचे नेते व कार्यकर्त्यांनी बुधवारी पोलीस आयुक्तालयात गोंधळ घातला. सुमारे तीन तासांनंतर स्वत: पोलीस आयुक्तांनी या प्रकरणी लक्ष घालण्याचे व संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले व त्यानुसार इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सोशल मीडियावर गेल्या दोन दिवसांपासून एका नोंदणी पद्धतीने विवाह संदर्भातील नोटीस संबंधितांच्या नाव, पत्ता व छायाचित्रानिशी व्हायरल झाली आहे. या नोटिसीप्रमाणे विवाहेच्छुक युवतीला ‘वाचवा’ म्हणूनही सोशल मीडियावर आवाहन करण्यात येत असल्याने त्याचा आधार घेत, विश्व हिंदू परिषदेसह हिंदुत्ववादी संघटनांनी त्या युवतीच्या कुटुंबाचा शोघ घेतला. तत्पूर्वीच सदर युवतीस तरुणाने मित्रांच्या मदतीने घरातून पळवून नेल्याचे व जाताना युवतीची आई व भावाला मारहाण केल्याची माहिती युवतीच्या आईने हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना दिली. त्यानुसार मंगळवारी सकाळी काही कार्यकर्त्यांनी युवतीची आई व भावास सोबत घेऊन इंदिरानगर पोलीस ठाण्यात संंबंधितांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यासाठी धाव घेतली. परंतु वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत सावंत यांनी त्यांना अपमानास्पद वागणूक देत गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. दरम्यान, इंदिरानगर पोलीस या साऱ्या प्रकरणात चालढकल करीत असल्याचा आरोप करीत, हिंदुत्ववादी संघटनांनी बुधवारी सकाळी युवतीची आई व भावासह पोलीस आयुक्तालय गाठून जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. युवतीशी चुकीच्या पद्धतीने नोंदणी विवाह करणे, तिच्या आई व भावास मारहाण करणे व इंदिरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार देणे या साऱ्या गोेष्टींची चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. त्यावर प्रारंभी पोलीस उपआयुक्त विजय पाटील यांनी कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेत कारवाईचे आश्वासन दिले़ मात्र संघटनेच्या नेत्यांनी यामध्ये पोलीस आयुक्तांनीच लक्ष घालावे व पोलीस निरीक्षक सावंत यांच्यावर कारवाई करावी, या मागणीवर ठाम राहिल्याने अखेर पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन, पोलीस उपआयुक्त एन. अंबिका, विजय पाटील, श्रीकांत धिवरे, सहायक पोलीस आयुक्त अतुल झेंडे यांच्यासोबत भाजपा उद्योग आघाडीचे प्रदीप पेशकार, विश्व हिंदू परिषदेचे गणेश सपकाळ, बजरंग दलाचे विनोद थोरात, मराठा महासंघाचे चंद्रकांत बनकर, हिंदू एकता आंदोलनचे रामसिंग बावरी यांनी चर्चा केली़ पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर दुपारी आंदोलन मागे घेण्यात आले.