शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एकता पॅनलच्या  नामसाधर्म्याने संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 23:53 IST

नाशिक इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) निवडणुकीत प्रथमच तीन पॅनलमध्ये निवडणूक होत असली तरी एकता नावाच्या दोन पॅनलमुळे मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मतदारांचा संभ्रम दूर करता करता उमेदवारांची दमछाक होत आहे.

सातपूर : नाशिक इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) निवडणुकीत प्रथमच तीन पॅनलमध्ये निवडणूक होत असली तरी एकता नावाच्या दोन पॅनलमुळे मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मतदारांचा संभ्रम दूर करता करता उमेदवारांची दमछाक होत आहे.  निमाच्या द्वैवार्षिक निवडणुकीत प्रथमच तीन पॅनल निवडणूक रिंगणात उतरले आहेत. सत्ताधारी एकता पॅनलमध्ये गटबाजी झाल्याने एका एकताचे दोन एकतामध्ये (हरिशंकर बॅनर्जी-उदय खरोटे यांचे आणि किशोर राठी-आशिष नहार यांचे) असे रूपांतर झाले आहे. तर या दोन एकताच्या विरोधात उद्योग विकास पॅनल निवडणूक रिंगणात उतरले आहे. उद्योग विकास पॅनलदेखील पूर्वीचे एकता पॅनलच होते. म्हणजेच एकता पॅनलची विभागणी तीन पॅनलमध्ये झाली असे म्हटले जात आहे. त्यामुळे तीनही पॅनलचे उमेदवार हे पूर्वी एकताच्या छताखालीच होते. निमा निवडणुकीत एकताचे जे दोन गट (पॅनल) पडले आहेत, त्या दोघांनी आपल्या पॅनलला एकता नाव दिले आहे आणि आमचीच ओरिजिनल एकता असल्याचे दोन्ही पॅनलकडून दावा केला जात आहे. मत मागण्यासाठी प्रचार करीत असताना आमची एकता कोणती आहे याचे स्पष्टीकरण मतदारांना द्यावे लागत आहे. तरीही मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.निवडणुकीतील पॅनलच्या नामसाधर्म्यामुळे मतदारांमध्ये गोंधळाचे वातावरण पसरले आहे. तर पॅनलमधील बहुतांश उमेदवारांना मतदार ओळखत नसल्याने पॅनलच्या नेत्यांना उमेदवारांची ओळख करून द्यावी लागत आहे. एकूणच उमेदवारांची मत मागताना चांगलीच दमछाक होत आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकMIDCएमआयडीसी