शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यातील नमुन्यांमुळे गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 01:00 IST

शहरातील गोदावरीसह सर्वच नद्या प्रदूषित असतानादेखील महापालिकेच्या पर्यावरण अहवालात मात्र त्या शुद्ध असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. मात्र त्यानंतर टीकेची झोड उठल्यानंतर प्रशासनाने सावध पवित्रा घेतला आहे.

नाशिक : शहरातील गोदावरीसह सर्वच नद्या प्रदूषित असतानादेखील महापालिकेच्या पर्यावरण अहवालात मात्र त्या शुद्ध असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. मात्र त्यानंतर टीकेची झोड उठल्यानंतर प्रशासनाने सावध पवित्रा घेतला आहे. गेल्यावर्षी पावसाळा संपल्यानंतर नद्या प्रवाही असताना नमुने घेतल्याने त्यात प्रदूषणकारी घटक आढळले नाहीत. गोदावरी नदीसह संबंधित नद्या प्रदूषणमुक्त आहेत, असा प्रशासनाचा दावा नसून असलेले प्रदूषण दूर करण्यासाठी अनेक प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व महापालिकांना वार्षिक पर्यावरण अहवाल तयार करणे बंधनकारक असते. १ जानेवारी ते ३१ डिसेंबरपर्यंत शहराच्या विविध भागात जल, वायू आणि ध्वनी प्रदूषणाचे मापन करून हा अहवाल पुढील वर्षी जुलै महिन्याच्या आत मंजूर करणे बंधनकारक आहे त्यानुसार यंदा अहवाल मांडण्यात आला. त्यात गोदावरी, नासर्डी, वालदेवी आणि कपिला या नद्यांचे पाणी नमुने तपासून अंतिमत: नदीपात्रातील पाणी शुद्ध असल्याचा दावा करण्यात आला. याशिवाय नाशिक शहरातील हवा उत्तम आहे. केवळ ध्वनिप्रदूषण अधिक आहे, असादेखील निष्कर्ष काढण्यात आला आहे. तथापि, गोदावरी नदीचे प्रदूषण हा सध्या पर्यावरणप्रेमींच्या दृष्टीने आस्थेचा विषय आहे. गेल्या काही वर्षांपासून यातील काही पर्यावरणप्रेमी कायदेशीर लढत आहेत, तर काहीजण जनप्रबोधन आणि अन्य सकारात्मक उपक्रम राबवित आहेत. असे असताना अचानक महापालिकेने काढलेल्या निष्कर्षामुळे खळबळ उडाली. विशेष म्हणजे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती गठित असून, ही समिती निरीने नदी प्रदूषणमुक्तीसाठी दिलेल्या शिफारसींची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. असे असताना महापालिकेच्या अहवालामुळे संभ्रम निर्माण झाला होता. तर काही पर्यावरणप्रेमींनी नदीचे पाणी प्रक्रियेशिवाय इतके शुध्द असेल तर आयुक्तांसह पर्यावरण अधिकाऱ्यांनी जलप्राशन करून दाखवावे, असे आव्हान दिले.दरम्यान, यासंदर्भात मनपाचे पर्यावरण अधिकारी नितीन वंजारी यांनी नद्या प्रदूषित नाही, असे मनपाने म्हटलेले नाही. मनपाने पावसाळ्यानंतर पाण्याचे नमुने घेतले. त्या दरम्यान नदी प्रवाही असल्याने वेगळा निष्कर्ष काढला, असे सांगितले. गोदावरी नदीचे प्रदूषण दूर करण्यासाठी मनपाच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे सांगितले.गोदावरी नदीसह संबंधित नद्या प्रदूषणमुक्त आहेत, असा प्रशासनाचा दावा नसून असलेले प्रदूषण दूर करण्यासाठी अनेक प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.महापालिकेने पावसाळ्यात नद्यांच्या पाण्याचे नमुने घेतल्यानंतर ते प्रदूषित आले नाहीत यावरून बराच गोंधळ झाला. आता प्रशासन अहवाल वर्षात तीन वेळा पाण्याचे नमुने घेऊन निष्कर्ष काढणार आहेत. महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी तसे आदेश दिले असल्याची माहिती पर्यावरण अधिकारी वंजारी यांनी दिली.

टॅग्स :godavariगोदावरीNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका