शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

शिवसेनेच्या अंतर्गत वादामुळे गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 01:21 IST

नाशिक : येथील प्रभाग क्रमांक २६ मध्ये नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी आलेल्या महापौर सतीश कुलकर्णी यांच्या समोरच शिवसेनेचे नगरसेवक भागवत आरोटे व स्थानिक नागरिक तथा शिवसेना माजी विभाग प्रमुख सुधाकर जाधव यांच्यात शाब्दीक बाचाबाची व शिवीगाळ झाल्याने काही काळ येथे तणाव निर्माण झाला होता.

नाशिक : येथील प्रभाग क्रमांक २६ मध्ये नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी आलेल्या महापौर सतीश कुलकर्णी यांच्या समोरच शिवसेनेचे नगरसेवक भागवत आरोटे व स्थानिक नागरिक तथा शिवसेना माजी विभाग प्रमुख सुधाकर जाधव यांच्यात शाब्दीक बाचाबाची व शिवीगाळ झाल्याने काही काळ येथे तणाव निर्माण झाला होता. सदर प्रकार सुरू असल्याने महापौरांना त आपला दौरा अर्धवट सोडावा लागला.शुक्रवारी दुपारी हा प्रकार घडला. खुटवड नगर भागातील समस्या सोडवण्यासाठी येथिल नगरसेविका अलका आहेर यांनी महापौर सतीश कुलकर्णी यांना निमंत्रित केले होते. यावेळी त्यांनी भागवत आरोटे यांनाही बोलवले होते. दौरा सुरू झाल्यानंतर आरोटे आणि साहेबराव जाधव आमने सामने आले. आणि वादाला सुरुवात झाली. 3 वर्षांपूर्वी मनपा निवडणूकीच्या वेळी इच्छुकांनी काढलेल्या आपल्या निधीतील रकमेच्या खर्चवरून हा वाद झाला, असे सांगण्यात आले. हा वाद वाढत गेला आणि अर्वाच्य शिविगाळ करण्यापर्यंत आणि पुढे झटापटीपर्यंत गेला अन्य नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी मध्यस्थी केली असली तरी महापौर सतीश कुलकर्णी यांना दौरा अर्धवट सोडावा लागला.यावेळी नगरसेवक मधुकर जाधव, नगरसेविका अलका आहिरे, नगरसेविका हर्षदा गायकर, भाजप पदाधिकारी कैलास आहिरे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यासंदर्भात नगरसेवक आरोटे व जाधव यांच्यावर परस्परविरोधी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास अंबड पोलीस ठाण्याचे वपोनी कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना