शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

एकाच विमानतळाला तीन नावांमुळे प्रवाशांत संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 00:46 IST

जानोरी : दिंडोरी तालुक्यातील नाशिकपासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या जानोरी गावातील नाशिक एअरपोर्टला एकाऐवजी तीन नावांनी ओळखले जाते, त्यामुळे या विमानतळाचे खरे नाव काय याबाबत प्रवाशी तसेच जानोरी व ओझरच्या ग्रामस्थांमध्ये संभ्रमावस्था आहे. तथापि, या गावाने जमिनी दिल्यामुळे सदर विमानतळाचे नामकरण ह्यजानोरी नाशिक एअरपोर्टह्ण असे करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ठळक मुद्दे‘जानोरी नाशिक एअरपोर्ट’ अशा नामकरणाची मागणी

सन २०१३ ते २०१४ साली छगन भुजबळ सार्वजनिक बांधकाममंत्री असताना त्यांच्या प्रयत्नाने एचएएल हद्दीत जानोरीलगत विमानतळाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. या विमानतळाच्या इमारतीवर नाशिक एअरपोर्ट असा उल्लेख आहे. ओझरचे ग्रामस्थ या विमानतळाला ओझर विमानतळ या नावाने तर जानोरीचे ग्रामस्थ जानोरी विमानतळ अशा नावाने ओळखतात. त्यामुळे प्रवाशी तसेच ओझर आणि जानोरी ग्रामस्थांमध्ये या तीन नावांबद्दल संभ्रम निर्माण होत आहे. या विमानतळाला जानोरी ग्रामस्थांच्या जमिनी गेलेल्या आहेत. जानोरी हद्दीतच विमानतळाची एंट्री ठेवण्यात आली आहे. विमानतळाला लागणाऱ्या मोठ्या रस्त्याची अडचण येऊ लागली, तेव्हा जानोरीच्या शेतकऱ्यांनी सरकारी मोबदल्यात शेतीचे काही क्षेत्र दिले. एवढेच नव्हे; तर जानोरी ग्रामपंचायतीनेही वेळोवेळी मदत करून विमानतळासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता केली. ग्रामस्थांनी वेळोवेळी मदत करूनही सदर विमानतळाचे नाव जानोरी विमानतळ असे न दिल्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. गावाची लोकसंख्या अंदाजे नऊ ते दहा हजार असून, गावात अनेक तरुण बेरोजगार आहेत. आपल्या गावात विमानतळ होत असल्याने आपल्याला कोणते ना कोणते काम मिळेल, अशी येथील अनेक तरुणांना अपेक्षा होती. परंतु, तसे काहीही न घडल्याने तरुणांचा अपेक्षाभंग झाला आहे.बाहेरील राज्यातून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळाच्या दोन ते तीन नावांमुळे दिशाभूल होत आहे. काही प्रवाशी अनेक ठिकाणच्या फलकावरील ओझर विमानतळ असे नाव वाचल्यामुळे नाशिक एअरपोर्टला येण्याऐवजी ओझरला निघून जातात. तेथून पुन्हा जानोरीला येतात. तेथील ग्रामस्थांना विमानतळाचा पत्ता विचारतात. त्यामुळे शासनाने सदर विमानतळाला जानोरी नाशिक एअरपोर्ट असे नाव द्यावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

टॅग्स :NashikनाशिकAirportविमानतळ