शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

समाजकल्याण अधिकाऱ्याच्या परस्पर पदमुक्तीने गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 20:01 IST

सभेला सुरुवात होताच, समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर व्यासपीठावर विराजमान न होता त्या थेट सदस्यांच्या आसनावर जाऊन बसल्या. अध्यक्ष सांगळे यांनी त्यांना व्यासपीठावर बसण्याचा आग्रह धरला

ठळक मुद्देसभापतींनी स्थान सोडले : प्राची वाजेंवर कारवाईचे आश्वासन गेल्या अडीच वर्षांत सहा ते सात अधिकारी या पदावर बदलून गेले

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या प्रभारी अधिकारी प्राची वाजे यांनी स्थायी समितीच्या पूर्वसंध्येलाच परस्पर पदमुक्ती करून घेतल्याचे तीव्र पडसाद मंगळवारच्या सभेत उमटले. समाजकल्याण सभापतींसह उपाध्यक्ष, महिला बालकल्याण सभापतींनीही व्यासपीठाचे आसन सोडून थेट सदस्यांमध्ये बसून प्रशासनाच्या काराभाराविरुद्ध रोष व्यक्त केल्यानंतर वाजे यांची आजची गैरहजेरी विनावेतन करण्याची, त्याचबरोबर त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी दिले.

५ डिसेंबर रोजी कोरमअभावी तहकूब करावी लागलेली स्थायी समितीची सभा मंगळवारी अध्यक्षा शीतल सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेला सुरुवात होताच, समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर व्यासपीठावर विराजमान न होता त्या थेट सदस्यांच्या आसनावर जाऊन बसल्या. अध्यक्ष सांगळे यांनी त्यांना व्यासपीठावर बसण्याचा आग्रह धरला असता, चारोस्कर यांनी समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणावर हल्ला चढविला. गेल्या अडीच वर्षांत सहा ते सात अधिकारी या पदावर बदलून गेले असून, खात्याचा कारभार विस्कळीत झाला आहे. अनेक योजनांवरील निधी खर्च होण्यास त्यामुळे अडथळे निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. सध्याचे समाजकल्याण अधिकारी प्राची वाजे यांनी अन्य कामाच्या व्यापामुळे आपण जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण खात्याचे कामकाज करण्यास असमर्थ असल्याचे दर्शवून परस्पर पदमुक्त झाल्याचे पत्र दिल्याचे चारोस्कर यांनी सांगितले. त्यावरून भास्कर गावित, उपाध्यक्षा नयना गावित, डॉ. आत्माराम कुंभार्डे, बाळासाहेब क्षीरसागर यांनीही चर्चेत भाग घेऊन प्रशासन परस्पर अधिकाºयांच्या बदल्या व पदमुक्त करीत असून, पदाधिकाºयांना तसेच अध्यक्षांनाही विश्वासात घेत नसल्याचा आरोप केला. अपंगांच्या योजना तसेच व्यक्तिगत लाभार्थ्यांना वाहन खरेदीचे पैसे अदा करण्यात आलेले नाहीत, असे सांगून चारोस्कर यांनी समाजकल्याण खात्याला पूर्ण वेळ अधिकाºयाची नेमणूक करावी, अशी मागणी केली. प्राची वाजे यांच्या एकतर्फी पदमुक्तीबाबत प्रशासनही अनभिज्ञ असल्याचे पाहून उपाध्यक्ष नयना गावित, महिला व बालकल्याण सभापती अपर्णा खोसकर यांनीही आपले आसन सोडून सदस्यांच्या आसनावर ठिय्या मारला.अधिकारी परस्पर बदलले जात असतील अथवा त्यांच्याकडे पदभार दिला जात असेल तर प्रशासनाकडून अध्यक्ष व संबंधित खात्याच्या सभापतींना माहिती का दिली जात नाही, असा सवाल करून प्रशासन पदाधिकाºयांची चेष्टा करीत असल्याची भावना सदस्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद