शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्याप्रकरणी  कारवाईत दुजाभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 01:30 IST

पोलीस व न्यायिक कोठडीतील मृत्यूसंदर्भात शासनाच्या अध्यादेशातील सूचनांनुसार अटक करणारा अधिकारी, तपास अधिकारी, स्टेशन हाउस आॅफिसर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना जबाबदार धरणे अपेक्षित असताना ज्यांनी कोठडीतील संशयिताच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केले त्यांच्यावरील कारवाई टळल्याने या प्रकरणातील बड्या अधिकाऱ्यांना वाचविण्यात आल्याची पोलीस वर्तुळात चर्चा आहे़

नाशिक : पोलीस व न्यायिक कोठडीतील मृत्यूसंदर्भात शासनाच्या अध्यादेशातील सूचनांनुसार अटक करणारा अधिकारी, तपास अधिकारी, स्टेशन हाउस आॅफिसर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना जबाबदार धरणे अपेक्षित असताना ज्यांनी कोठडीतील संशयिताच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केले त्यांच्यावरील कारवाई टळल्याने या प्रकरणातील बड्या अधिकाऱ्यांना वाचविण्यात आल्याची पोलीस वर्तुळात चर्चा आहे़  सिन्नर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्यानंतर तपासी अंमलदाराने आरोपी जाधव यास अटक केली़ यानंतर पोलीस लॉकअपमध्ये ठेवल्यानंतर अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांच्या कालावधीत जाधव याने आत्महत्या केली़ विशेष म्हणजे पोलीस कोठडीतील आरोपीसाठी आवश्यक असलेला बंदोबस्तच तैनात नसल्याचे समजते़ आरोपींसाठी असलेल्या चार गार्डपैकी तीन गार्ड वरिष्ठांच्या आदेशानुसार इतरत्र बंदोबस्तासाठी पाठविण्यात आल्याची माहिती आहे़ आरोपीच्या सुरक्षिततेसाठी पोलीस बंदोबस्त ठेवणे आवश्यक असून, सिन्नर पोलीस ठाण्याची पोलीस कोठडी ही ठाणे अंमलदारापासून सुमारे ५० ते ६० फुटांच्या अंतरावर आहे़ त्यामुळे अधीक्षकांनी अटक आरोपीच्या सुरक्षिततेची प्राथमिक जबाबदारी निश्चित करून कारवाई करणे अपेक्षित होते़ मात्र, या कारवाईपासून वरिष्ठांना वाचविले जात असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे़  पोलीस व न्यायिक कोठडीतील मृत्यूसंदर्भात उच्च न्यायालयात दाखल फौजदारी याचिकेत दिलेल्या निर्णयानुसार शासनाने काढलेल्या अध्यादेशात अटक आरोपीच्या सुरक्षिततेबाबत काही मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत़ या अध्यादेशातील सूचना क्रमांक दोननुसार अटक आरोपीची सुरक्षा, आरोग्य व जीविताची जबाबदारी ही त्यास अटक करणारा अधिकारी, तपास अधिकारी, स्टेशन हाउस आॅफिसर व त्या पोलीस ठाण्याचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची राहील, असे स्पष्ट म्हटले आहे़

टॅग्स :Policeपोलिस