शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

चारा छावण्यांसाठी संस्थांची प्रशासनाकडून मनधरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 00:02 IST

नाशिक : दुष्काळी परिस्थितीत जनावरांच्या चारा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसागणिक गंभीर होत चालला असून, त्यावर शासनाकडून उपाययोजना केल्या जात असताना प्रत्यक्षात मात्र त्यास प्रतिसाद मिळत नसल्याची बाब चारा छावण्यांवरून स्पष्ट झाली आहे. नाशिक जिल्ह्णात जनावरांच्या चारा छावण्यांची मागणी ग्रामीण भागातून होत असली तरी, छावणी सुरू करण्यास कोणीही पुढे येत नसल्याने जिल्हा प्रशासन अडचणीत सापडले असून, त्यातूनच बाजार समित्या, खासगी संस्थांची मनधरणी करण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देकोणी पुढे येईना :। तुटपुंजे अनुदान, चाऱ्याची कमतरता

नाशिक : दुष्काळी परिस्थितीत जनावरांच्या चारा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसागणिक गंभीर होत चालला असून, त्यावर शासनाकडून उपाययोजना केल्या जात असताना प्रत्यक्षात मात्र त्यास प्रतिसाद मिळत नसल्याची बाब चारा छावण्यांवरून स्पष्ट झाली आहे. नाशिक जिल्ह्णात जनावरांच्या चारा छावण्यांची मागणी ग्रामीण भागातून होत असली तरी, छावणी सुरू करण्यास कोणीही पुढे येत नसल्याने जिल्हा प्रशासन अडचणीत सापडले असून, त्यातूनच बाजार समित्या, खासगी संस्थांची मनधरणी करण्याची वेळ आली आहे.शासनाने शेतकरी मागेल त्याठिकाणी जनावरांसाठी चार छावण्या सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी लहान जनावरांसाठी ४५ रुपये व मोठ्या जनावरांसाठी ९० रुपये अनुदान जाहीर केले आहे. एका शेतकºयाचा फक्त पाच जनावरांना छावणीत प्रवेश देण्यात यावा, तसेच छावणी चालकानेच चारा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. त्याचबरोबर शासनाकडे दहा लाख रुपये अनामत रक्कम भरणे सक्तीचे केले आहे. छावण्यांमधील यापूर्वी चारा घोटाळ्याचा अनुभव लक्षात घेता वेळोवेळी छावणीची विविध यंत्रणांमार्फत तपासणी केली जाणार आहे. बाजार समित्या, सहकारी संस्था, सामाजिक संस्था, व्यक्तिगत व्यक्तीलाही छावणी सुरू करण्याची मुभा आहे, परंतु त्यासाठी उपरोक्त यंत्रणांचा अनुभवही लक्षात घेण्याची अट टाकण्यात आली आहे़संपूर्ण एप्रिल महिन्यात चारा छावणीसाठी चालकाची प्रतीक्षा करण्यात आली, परंतु कोणी पुढे आले नाही. अखेर जिल्हा प्रशासनानेच प्रत्येक बाजार समित्यांना तसेच खरेदी-विक्री संघांना संपर्क साधून त्यांना प्रस्ताव सादर करण्यासाठी गळ घालण्यास सुरुवात केली आहे.काही बाजार समित्यांनी त्यासाठी होकारही कळविला असला तरी, तसा प्रस्ताव मात्र सादर केलेला नाही. संस्थांच्या मते एका जनावराच्या मागे दिवसाकाठी मिळणारे ९० रुपयांचे अनुदान कमी असून, ग्रामीण भागात छावणीसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कशी व कोठून करणार, असा प्रश्न आहे. शिवाय नाशिक जिल्ह्णात तसेच लगतच्या कोणत्याही जिल्ह्णात चारा शिल्लक नाही, त्याची पर जिल्हा-राज्यांतून वाहतूक करणे खर्चिक बाब आहे. छावण्यांची वाढती मागणीनाशिक जिल्ह्णातील नांदगाव, बागलाण, सिन्नर, येवला, मालेगाव आदी तालुक्यांमधून जनावरांसाठी चारा वा चारा छावण्यांची मागणी केली जात असून, जनावरांच्या चाºयाची कमतरता दिवसागणिक वाढत चालली आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने वारंवार आवाहन करूनही चारा छावणी सुरू करण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नसल्याचे चित्र आहे.