शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

छाननीनंतर उमेदवारी घोषित करण्याची व्यूहरचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 01:03 IST

नाशिक मर्चंट को-आॅपरेटिव्ह बॅँकेच्या निवडणुकीसाठी आता चार पॅनल सज्ज होत असले तरी कोणत्याही पॅनलच्या प्रवर्तकांनी आपले अंतिम उमेदवार घोषित करण्यासाठी गुरुवारी (दि.२९) छाननीनंतरचा मुहूर्त शोधला आहे. बहुतांशी उमेदवार माघारीनंतरच घोषित केले जाण्याची चिन्हे आहेत.

नामको बॅँक निवडणूकनाशिक : नाशिक मर्चंट को-आॅपरेटिव्ह बॅँकेच्या निवडणुकीसाठी आता चार पॅनल सज्ज होत असले तरी कोणत्याही पॅनलच्या प्रवर्तकांनी आपले अंतिम उमेदवार घोषित करण्यासाठी गुरुवारी (दि.२९) छाननीनंतरचा मुहूर्त शोधला आहे. बहुतांशी उमेदवार माघारीनंतरच घोषित केले जाण्याची चिन्हे आहेत.नाशिक मर्चंट बॅँकेत यंदा अभुतपूर्व चुरस दिसत आहे. हुकूमचंद बागमार यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या सर्व जुन्या संचालकांनी प्रगती पॅनल तयार केले असून, त्यांना पारंपरिक सहकार पॅनलचे आवाहन आहे. हुकूमचंद बागमार यांचे सुपुत्र अजित बागमार यांनी नम्रता पॅनल नाव घेऊन निवडणूक रिगंणात आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे, तर अ‍ॅड. श्रीधर व्यवहारे यांच्या नेतृत्वाखाली नव्याने प्रामाणिक पॅनल उभे राहिले आहे. एका पॅनलकडून एखाद्या इच्छुकाला उमेदवार म्हणून संधी मिळू लागताच प्रतिस्पर्धी पॅनलचे नेते संबंधितांवर दबाव आणून त्याला निवडणूक रिंगणात उतरूच देत नाहीत त्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहेत.बागमार समर्थकांच्या प्रगती पॅनलमध्ये किमान तीन ते चार जागांवर नव्या उमेदवारांना देण्याची तयारी असून, त्यासाठी अनेक उमेदवार चर्चेत आहेत. मात्र, गुरुवारी (दि.२९) नंतरच उमेदवार घोषित करू, असे सांगितले जात आहे. हीच भूमिका सहकार पॅनलने घेतली असून त्यांनीदेखील माघारीनंतरच सर्व उमेदवार घोषित होतील, असे सांगितले. अजित बागमार यांच्या पॅनलचे आठ, तर व्यवहारे यांच्या पॅनलने चार उमेदवार घोषित केले असून, तेदेखील छाननीनंतरच उमेदवार घोषित करणार आहेत.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रNashikनाशिकElectionनिवडणूक