शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

अपंगांप्रश्नी पालिकेकडून चुकांची कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 01:07 IST

नाशिक : महापालिका अपंगांसाठी राखीव ठेवण्यात येणारा तीन टक्के निधी खर्च करू शकली नाही, अशी कबुली मनपाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : विदर्भातील अचलपूरचे अपक्ष आमदार व प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी अपंगांच्या प्रश्नी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आपल्या आक्रमक शैलीत जाब विचारल्यानंतर महापालिका अपंगांसाठी राखीव ठेवण्यात येणारा तीन टक्के निधी खर्च करू शकली नाही, अशी कबुली मनपाच्या अधिकाऱ्यांनी दिली. यावेळी, मागील आर्थिक वर्षाचा निधी येत्या सप्टेंबरपर्यंत तर चालू आर्थिक वर्षाचा निधी मार्च २०१८ अखेर खर्च करण्याची हमी घेतल्यानंतरच कडू यांनी आयुक्तांचे दालन सोडले. प्रहार संघटनेने अपंगांच्या विविध प्रश्नांवर महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन केले. त्यानंतर आमदार बच्चू कडू यांच्यासमवेत शिष्टमंडळाने आयुक्त अभिषेक कृष्ण यांची भेट घेऊन चर्चा करायला सुरुवात केली असता,  आयुक्त व कडू यांच्यात शाब्दीक चकमकी झडल्या. त्यामुळे आयुक्त चर्चा सोडून निघून गेले. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे, प्रशासन उपआयुक्त हरिभाऊ फडोळ, शहर अभियंता उत्तम पवार, मुख्य लेखापाल सुभाष भोर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय डेकाटे यांनी कडू यांच्याशी चर्चा करत त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. मागील वर्षी राखीव तीन टक्के खर्च करू शकलो नसल्याची कबुली यावेळी अधिकाऱ्यांनी दिली तर यावर्षीच्या अंदाजपत्रकात महासभेने १० कोटी रुपयांची तरतूद केल्याचे सांगितले. परंतु, कडू यांनी अखर्चित निधीबद्दल जाब विचारत अधिकाऱ्यांना असभ्य भाषाही वापरली. अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे व प्रशासन उपआयुक्त हरिभाऊ फडोळ यांनी निधी खर्च करण्याबाबत आश्वस्त केले शिवाय, सन २०१३ मध्ये अपंगांच्या नोंदणीत ५०८ जणांची नोंदणी झाल्याचेही स्पष्ट केले. परंतु, कडू यांनी आपली आक्रमक भूमिका कायम ठेवली. अपंग लाभार्थ्यांचे आशा कर्मचाऱ्यांमार्फत तातडीने सर्वेक्षण करा, सर्वेक्षणाचे काम एनजीओमार्फत करू नका, घरकुल योजनेत अपंग लाभार्थ्यांना प्राधान्य द्या, त्यांना गाळ्यांचे वाटप करा, अपंग खेळाडूंचा शोध घेऊन त्यांना शिष्यवृत्ती द्या, त्यांच्या वैद्यकीय खर्चासाठी निधी उपलब्ध करून द्या, महापालिका कार्यालयांमध्ये अपंग कर्मचाऱ्यांसाठी रॅम्प बनवा आदी सूचनाही कडू यांनी केल्या. यावेळी अधिकाऱ्यांनी त्याबाबत सकारात्मक पाऊल उचलण्याचे आश्वासन दिले.उपआयुक्तांवरही कारवाईची मागणीएका अपंग बांधवाने पाचदा स्मरणपत्रे देऊनही त्याला साधे उत्तर देण्याची तसदी मनपाने दाखविली नसल्याने बच्चू कडू यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी कडू यांनी स्मरणपत्रांच्या तारखांचे वाचन करत अपंगांना सन्मानाने वागणूक न देणाऱ्या उपआयुक्तांवर तातडीने कारवाईची मागणी केली. कारवाई केली नाही तर त्या अधिकाऱ्यासाठी आपण पुन्हा स्पेशल येऊ, असा दमही कडू यांनी भरला. कडू यांच्या आक्रमक भूमिकेमुळे अधिकारीवर्ग मात्र पुरता हादरला होता.