शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरील वाहनांमुळे कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 01:17 IST

वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील लॉन्स व मंगल कार्यालयांलगत तासन्तास उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीची समस्या अद्याप सुटलेली नाही. या प्रकारामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांनी दखल घेऊन तातडीने रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

इंदिरानगर : वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील लॉन्स व मंगल कार्यालयांलगत तासन्तास उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीची समस्या अद्याप सुटलेली नाही. या प्रकारामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांनी दखल घेऊन तातडीने रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.सुमारे सतरा वर्षांपूर्वी दोन टप्प्यात वडाळा नाका ते पाथर्डी गाव असा वडाळा-पाथर्डी नागपूर पॅटर्नचा रस्ता तयार करण्यात आला. सदर रस्ता करण्यापूर्वी रस्त्याच्या दोन्ही बाजूस व्यावसायिकांनी आपल्या दुकानासमोर पक्के बांधलेले ओटे आणि पत्र्याचे शेड हे रस्ता रुंदीकरणासाठी अडथळा ठरत असल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटा घेऊन अतिक्र मण विभागाने जमीनदोस्त केली. त्यानंतर रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरण करण्यात आले. तसेच वाहनांवर नियंत्रण रहावे आणि समोरासमोर अपघात होऊ नये म्हणून रस्त्याच्या मधोमध दुभाजक टाकण्यात आले. त्या दुभाजकांमध्ये खजूर व शोभिवंत वृक्ष लावण्यात आल्याने रस्त्याच्या सौंदर्यात भरच पडली आहे. रस्ता झाल्यामुळे वाहतुकीची समस्या सुटेल, असे वाटले होते, परंतु काही दिवसांतच ते दिव्य स्वप्नच राहिले. कारण की वडाळा-पाथर्डी रस्त्यालगतच दहा ते बारा लॉन्स व मंगल कार्यालये असून त्यांच्याकडे वाहनतळाची अपुरी व्यवस्था असल्याने ज्या दिवशी विवाह सोहळा असतो त्यादिवशी रस्त्यावरच तासन्तास लहान आणि मोठी वाहने उभी राहतात. त्यामुळे रस्त्यालगत असलेल्या विविध उपनगरांतील नागरिकांना आणि रस्त्यालगत असलेल्या प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना रस्त्यावरून मार्गक्रमण करताना तारेवरची कसरत करावी लागते. त्यातूनच अनेक वेळेस लहान-मोठे अपघात घडतात. अनेक वेळेस संबंधित विभागाला निवेदन आणि समक्ष भेटून तक्रार करूनसुद्धा कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिकांनी उलटसुलट चर्चा करीत आहेवाहनतळाची व्यवस्था नाहीवडाळा-पाथर्डी रस्त्यावरील नासर्डी नदी पुलालगत, अमृत वर्षा कॉलनी व वनवैभव कॉलनी या ठिकाणी समोरासमोर लॉन्स व मंगल कार्यालय असल्याने विवाह समारंभाच्या दिवशी रस्त्यावर उभ्या राहणाºया वाहनांमुळे जणूकाही वाहतुकीस रस्ता बंद केला जातो. संबंधित विभागाने वाहनतळाची पुरेशी व्यवस्था नसताना कशी परवानगी दिली, असा प्रश्नही नागरिकांनी केला आहे.रस्त्यावरून पादचाऱ्यांना आणि वाहनधारकांना मार्गक्र मण करणे जिकिरीचे झाले आहे. संबंधित विभागाने वाहनतळाची पुरेशी व्यवस्था नसताना लॉन्स व मंगल कार्यालयांना परवानगी दिलीकशी ? असा प्रश्न वाहनधारकांना तसेच परिसरातील नागरिकांना पडला आहे.- अशोक लोळगे, रहिवासी

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीNashikनाशिक