पूररेषेत कॉँक्रिटीकरणाची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 11:37 PM2020-01-10T23:37:17+5:302020-01-11T01:22:31+5:30

स्मार्ट सिटी अंतर्गत गोदाकाठी साकारण्यात येत असलेल्या प्रोजेक्ट गोदाचा पहिला टप्पाही वादात सापडला आहे. रामवाडी ते होळकर पुलाच्या दरम्यान सुरू असलेल्या कामात पूररेषेत चक्क सीमेंटचे काम सुरू असल्याने उच्चाधिकार समितीच्या सदस्यांनी हरकत घेतली आहे. गोदावरी नदीच्या शुद्धीकरणासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशाने गठीत उच्चाधिकार समितीचे सदस्य राजेश पंडित आणि प्राचार्य प्राजक्ता बस्ते यांनी यासंदर्भात आक्षेप घेतला आहे.

Concretisation works in floodplain | पूररेषेत कॉँक्रिटीकरणाची कामे

‘प्रोजेक्ट गोदा’अंतर्गत रामवाडी ते होळकर पूल येथे निळ्या पूररेषत सीमेंटची सुरू असलेली कामे.

Next
ठळक मुद्देपर्यावरणप्रेमींची हरकत : ‘निरी’ची परवानगी नसल्याचा दावा

नाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत गोदाकाठी साकारण्यात येत असलेल्या प्रोजेक्ट गोदाचा पहिला टप्पाही वादात सापडला आहे. रामवाडी ते होळकर पुलाच्या दरम्यान सुरू असलेल्या कामात पूररेषेत चक्क सीमेंटचे काम सुरू असल्याने उच्चाधिकार समितीच्या सदस्यांनी हरकत घेतली आहे. गोदावरी नदीच्या शुद्धीकरणासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशाने गठीत उच्चाधिकार समितीचे सदस्य राजेश पंडित आणि प्राचार्य प्राजक्ता बस्ते यांनी यासंदर्भात आक्षेप घेतला आहे.
‘प्रोजेक्ट गोदा’अंतर्गत गोदावरी नदीच्या काठावर सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात रामवाडी ते होळकरपूल हा पहिला टप्पा आहे. त्यात विविध अ‍ॅक्टिव्हिटी व्यवस्था असणार आहे. अ‍ॅक्युप्रेशर वॉक, जॉगिंग ट्रॅक, कारंजा यांसह आकर्षक प्रवेशद्वारदेखील सादर करण्यात येणार आहे. सुमारे ६८ कोटी रुपयांचा हा पहिला टप्पा आहे. मात्र, ही सर्व कामे गोदावरी नदीच्या निळ्या पूररेषेत आहेत. नियमानुसार नदीपात्र ते निळी पूररेषा याठिकाणी बगिचा आणि खुली जागाच अनुज्ञेय आहे. कोणत्याही प्रकारचे बांधकाम अनुज्ञेय नाही. निळ्यारेषेपासून लालरेषेत स्टिल्ट बांधकाम म्हणजेच काही उंचीवरील बांधकाम अनुज्ञेय आहे. परंतु प्रोजेक्ट गोदा अंतर्गत निळ्या पूररेषेत सीमेंटची कामे सुरू आहेत.
काही दिवसांपूर्वी विभागीय आयुक्त राजाराम माने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतदेखील याबाबत प्राचार्य बस्ते आणि राजेश पंडित यांनी याबाबत मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर दोघांनी प्रत्यक्ष जागेवर पाहणी केली. यावेळी सीमेंटचे बांधकाम सुरू होते. याशिवाय येथील अधिकारी सिंग यांनी निरीची या प्रकल्पासाठी मान्यता असल्याचे सांगितले. यावर पंडित यांनी निरीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी निरीची परवानगी नसल्याचे सांगितले, असे पंडित यांचे म्हणणे आहे. त्यामुळे निरीची परवानगी नसताना सुरू असलेले बांधकाम थांबावावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

गॅबियन वॉललगत सीमेंटची भिंत
पर्यावरणाच्या निकषानुसार नदीकाठी सीमेंटची संरक्षक भिंत बांधता येत नाही. यापूर्वी पखालरोड येथे बांधकाम करताना त्यास विरोध झाल्यानंतर हे काम थांबविण्यात आले होते. मात्र, रामवाडीलगत गॅबियन (दगडांचे थर त्यावर जाळी) वॉल असून, त्यामागे सीमेंटची भिंत बांधण्याचा अजब प्रकार सुरू होता. त्यासदेखील विरोध करण्यात आला आहे.

Web Title: Concretisation works in floodplain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.